World Cup 2023 साठी भारतीय संघ जाहीर

 World Cup 2023 साठी भारतीय संघ जाहीर

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय क्रिकेट रसिकांना आता विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेध लागले आहेत. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतातील 10 शहरांमध्ये वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. दरम्यान आता राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी विश्व चषकासाठी भारतीय संघ निवडला असल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर शनिवारीच पल्लिकलला दाखल झाले. त्यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा भारत-पाकिस्तान लढतीनंतर झाली. आशिया कप स्पर्धेसाठी १७ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला होता. त्या संघासोबत सॅमसन राखीव होता. वर्ल्ड कपसाठी आशिया कपमधूनच संघ निवडण्यात येईल, असे संकेत अजित आगरकर यांनी दिले होते. त्यामुळे आशिया कप संघातील तिलक वर्मा, प्रसिध कृष्णा; तसेच राखीव संजू सॅमसन यांना डच्चू देण्याचे ठरले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वर्ल्ड कपसाठीचा संभाव्य भारतीय संघ

फलंदाज ः रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव

यष्टीरक्षक – फलंदाज ः लोकेश राहुल, ईशान किशन.

अष्टपैलू ः हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर

गोलंदाज ः जसप्रीत बुमराह, महंमद शमी, महंमद सिराज, कुलदीप यादव.

वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर करण्याची अखेरची तारीख पाच सप्टेंबर आहे. त्यासाठी राहुलची सोमवारी सराव सामन्यात चाचणी करण्याचे ठरले होते. मात्र, तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचा अहवाल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील ट्रेनर, फिजिओंनी दिला आहे. त्याचबरोबर त्याने दोन दिवसांच्या सरावात आपली तंदुरुस्ती सिद्ध केली असल्याचे निवड समिती सदस्यांचे मत आहे. त्यामुळे त्याचा आशिया कप संघातील सहभागही आता निश्चित झाला आहे. अर्थातच त्याची वर्ल्ड कप संघातही निवड होणार आहे. संघात ईशान किशन हा अतिरिक्त यष्टिरक्षक असल्याने संजू सॅमसनची वर्ल्ड कपची संधी हुकणार आहे.

SL/KA/SL

5 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *