भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह देण्यासाठी कॅनडा सरकारने मागितले 35 लाख

 भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह देण्यासाठी कॅनडा सरकारने मागितले 35 लाख

उज्जैन, दि. १७ : कॅनडामध्ये कारच्या धडकेमुळे मृत्यू झालेला उज्जैनचा विद्यार्थी गुरकीरत सिंग मनोचाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी त्याच्या कुटुंबासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. , कॅनडा सरकार मृतदेह देण्यासाठी सुमारे 40 हजार डॉलर (सुमारे 35 लाख रुपये) जमा करण्यास सांगत आहेत असे गुरकीरतच्या कुटुंबाचे म्हणणे आहे, इतकंच नाही, तर तपास प्रक्रियेमुळे रुग्णालयातून मृतदेह 15 दिवसांनीच दिला जाईल. कुटुंबाने सांगितले की, मृतदेह कॅनडातून उज्जैनला आणण्यासाठी सुमारे 10 लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च येईल.

अशा परिस्थितीत, कुटुंबाने केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाकडे मदतीची याचना केली आहे. माहितीनुसार, गुरकीरत सिंग मनोचाची दोन दिवसांपूर्वी कॅनडात कारने चिरडून हत्या करण्यात आली होती.

गुरकीरत सिंगचे वडील गुरजीत सिंग यांचे म्हणणे आहे की, एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था करणे त्यांच्यासाठी शक्य नाही. अशा परिस्थितीत सरकारनेच त्यांना मदत करावी. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

वडील गुरजीत सिंग यांनी सांगितले की, गुरकीरत सुमारे सव्वा वर्षापूर्वी शिक्षणासाठी कॅनडाला गेला होता. तो खूप शांत आणि चांगल्या स्वभावाचा होता. तो कोणत्याही वादात पडत नव्हता. ते म्हणाले की, ही घटना कुटुंबासाठी खूप दुःखद आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकरणी कॅनडामध्ये तपास सुरू आहे. स्थानिक पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे, तर इतर दोन-तीन संशयितांचा शोध सुरू आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *