भारतीय लघुपट ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ऑस्करने सन्मानित
लॉस अँजेलीस, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजचा दिवस भारतीय चित्रपटसृष्टीसाठी सुवर्णाक्षरात नोंदवून ठेवावा असा आहे. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात भारताला चार नामांकनं मिळाली होती. द एलिफेंट विस्परर्स’ या लघुपटाने बाजी मारली असून बेस्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. 41 मिनिटांचा हा लघुपट हत्ती आणि त्याला सांभाळणाऱ्या दांपत्याच्या आयुष्यावर भाष्य करतो. कार्तिकी गोन्सालवीस यांनी दिग्दर्शीत केलेल्या या माहितीपटाची निर्मिती गुनीत मोंगा यांनी केली आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ही डॉक्युमेंटरी उपलब्ध आहे.
त्याचबरोबर ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. नाटू नाटू हे तेलगु भाषेतील गाणे एम. एम. किरवाणी यांनी कंपोज केले आहे. राहूल सिप्लीगंज आणि काल भैरवा यांनी गायलेले हे गाणे एनटी रामाराव ज्युनिअर आणि रामचरण यांच्या धम्माल डान्स परफॉर्मन्सवर चित्रित करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलिफंट व्हिस्पर्र्स लघुपट आणि नाटू नाटू गाण्याच्या टिमचे या आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशाबद्दल विशेष ट्विट करून अभिनंदन केले आहे.
सर्वोत्कृष्ट सिनेमा- एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स. या सिनेमाला ११ विभागात नामांकन मिळाले होते. यापैकी या सिनेमाने सात विभागांत पुरस्कार मिळवले.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मिशेल योहला
सर्वोत्कृष्ट अभिनेता – ब्रेंडन फ्रेझर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट
सर्वोत्कृष्ट चित्रपट एडिटिंग – एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स
SL/KA/SL
13 March 2023