भारतीय रेल्वेची 100 टक्के विद्युतीकरणाकडे वाटचाल

 भारतीय रेल्वेची 100 टक्के विद्युतीकरणाकडे वाटचाल

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रेल्वे गेल्या दशकभराच्या कालावधीत आधुनिकीकरणाकडे वेगाने वाटचाल करत आहे. या वाटचालीतील सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण. आता रेल्वेच्या ब्रॉडगेज नेटवर्क चे 82% विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. रेल्वेने संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून यामुळे इंधनाची बचत होईल आणि परिणामी मौल्यवान अशा परकीय चलनाची देखील बचत होईल.

एप्रिल ते ऑक्टोबर 2022 दरम्यान 1223 किमी चे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे. विद्युतीकरणामुळे इंधनाचा अधिक कार्यक्षम वापर करणे शक्य झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्युतीकरणाच्या प्रमाणात 36.64% वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात  याच कालावधीत भारतीय रेल्वेचे 895 किमी विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

खंडप्राय असलेल्या आपल्या देशात प्रवासी आणि मालवाहतूकीचे एक प्रमुख किफायतशीर साधन म्हणून भारतीय रेल्वे महत्त्वपूर्ण ठरते. देशभरात सुमारे 68 हजार किलोमीटर चे लोहमार्गांचे जाळे विस्तारलेली भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वे म्हणून ओळखली जाते.

SL/KA/SL

10 Nov. 2022


mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *