इंडोनेशिया ओपन बॅडमिंटनस्पर्धेत भारताचे हे खेळाडू उपात्य फेरीत दाखल
जाकार्ता, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या अव्वल भारतीय पुरुष दुहेरी जोडीने शुक्रवारी जकार्ता येथे सुरू असलेल्या इंडोनेशिया ओपन 2023 पुरुष दुहेरी स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मोहम्मद रियान अर्दियान्टो आणि फजर अल्फियान या इंडोनेशियाच्या जोडीचा 21-13, 21-21 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
याशिवाय पुरुष एकेरीत एचएस प्रणॉयनेही जपानच्या कोडाई नाराओकाचा 21-18, 21-16 असा पराभव करून पुढील फेरीत आपले स्थान निश्चित केले. प्रणॉयने त्याच्या कारकिर्दीत प्रथमच जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकाच्या जपानी शटलरला पराभूत केले आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये आतापर्यंत 5 सामने झाले असून त्यापैकी 4 सामने जपानच्या खेळाडूने जिंकले आहेत.
दरम्यान, माजी विश्वविजेता किदाम्बी श्रीकांतचा या स्पर्धेतील प्रवास पुरुष एकेरीत चीनचा शटलर ली शी फेंगविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्याने संपुष्टात आला.
SL/KA/SL
16 June 2023