भारतातील पेन्शन धारकांचे न्यायासाठी आंदोलन तीव्र

 भारतातील पेन्शन धारकांचे न्यायासाठी आंदोलन तीव्र

मुंबई दि.1(एम एमसी न्यूज नेटवर्क) : सरकारी बँका व निवृत्तीवेतन प्राधिकरण संस्थेमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पेन्शन धारकांना आज हक्काच्या पेंशनला मुकावे लागत आहे. त्यामुळे आता या सर्व प्राधिकरणाच्या मनमानी कारभारविरोधात सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल करून वेळप्रसंगी आंदोलन तीव्र करून पेन्शन धारकांना न्याय दिला जाईल असे ” ऑल इंडिया एएमसी ऑफिसर असोशिएशन ” चे अध्यक्ष राहुल पोळ व विश्वास उटगी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रत्येक आर्थिक वर्षी या सर्व प्राधिकरणाकडून सरकारला अहवाल सादर करायचा असतो. या प्राधिकरणातील काही वरिष्ठ अधिकारी या अहवालात खोटी आकडेवारी सादर करून सरकारची करोडो रुपयांची फसवणूक करत आहेत.असा आरोप विश्वास उटगी यांनी यावेळी केला. अनेक अधिकारी निवृत्त झाले आहेत तरीही त्यांचे भत्ते, मानधन, प्रवास खर्च असे लाखो रुपये अनधिकृतपणे कमवत आहेत. अशा सर्व मनमानी लूट करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादी न्यायालयात सादर करणार असल्याचे पवन अब्रोल यांनी यावेळी सांगितले.

सर्वोच्य न्यायालयात याबाबत सर्व पुरावे सादर करत आंदोलनाची तयारीही सुरू केली आहे. सामान्य पेन्शन धारकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरच्या लढाई सोबत न्यायालय मधे लढाई लढणार असल्याचे यावेळी राहुल पोळ यांनी सांगितले.

सरकारला फक्त घोषणा करण्याचा आजार झाला आहे.त्या घोषणांची अंमलबजावणी करण्याचा विचार कधी होईल. योजनांची नावे बदलून काही फरक पडत नाही.बाटली तीच फक्त लेबल बदली करण्याचे काम सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही असे ” ऑल इंडिया एएमसी ऑफिसर असोशिएशन ” चे अध्यक्ष राहुल पोळ व विश्वास उटगी यांनी सांगितले.

ML/KA/SL

1 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *