भारतीय नौदल आणि सैन्याची सिम्फोनिक बँड कॉन्सर्ट

 भारतीय नौदल आणि सैन्याची सिम्फोनिक बँड कॉन्सर्ट

भारतीय नौदल आणि सैन्याची सिम्फोनिक बँड कॉन्सर्ट

नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेव्ही फौंडेशन नागपूर चॅप्टर, नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट (नागपूर) आणि मुख्यालय उमंग यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या कविवर्य सुरेश भट्ट सभागृहात भारतीय लष्कर आणि भारतीय नौदल सिम्फोनिक बँड कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी, नागरी मान्यवर, सेवानिवृत्त कर्मचारी आणि सशस्त्र दलातील सेवारत अधिकारी उपस्थित होते.

बँड कॉन्सर्टमध्ये सशस्त्र दलांच्या समृद्ध संगीत परंपरांवर प्रकाश टाकण्यात आला, ज्यामध्ये देशभक्तीपर सुरांपासून ते मन ढवळून निघणाऱ्या धुनांपर्यंतच्या अनेक तुकड्यांचा समावेश होता. एका पेक्षा एक सरस धून यावेळेला सादर करण्यात आली. या संगीत कार्यक्रमात देशभक्ती गीतांसह, जुनी गीते देखील सादर करण्यात आली. लष्करातील जवान तसेच अग्निवीर यांनी देखील या संगीत कार्यक्रमात सहभाग घेतला, त्यांनी गाणी आणि धून देखील वाजविली.

या कार्यक्रमामुळे शालेय मुलांना सैन्यदलातील करिअरचा विचार करण्याची प्रेरणा मिळाली. भारतीय नौदल बँड आणि उमंग मुख्यालयाचे आर्मी बँड यांच्यातील सहकार्याने सशस्त्र दलांना परिभाषित करणाऱ्या सौहार्द आणि उत्कृष्टतेची भावना अधोरेखित केली. मैफल संपल्यावर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नौदल बँड आणि परफॉर्मन्सचा सत्कार करण्यात आला. जीवनात संगीत आनंद देत असतो. जुन्या संगीतामुळे मनाला खूप प्रसन्नता मिळते असे मत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी यावेळेला व्यक्त केले. राष्ट्रासाठी सुरक्षाचा कर्तव्य करीत असताना आपण आपल्या कलेला जिवंत ठेवले याचा मला फार आनंद असल्याचे ते म्हणाले. रक्षा क्षेत्रात काम करीत असताना आपल्या साधनेचे प्रदर्शन केले त्यांचे अभिनंदन असल्याचे गडकरी म्हणाले. Indian Navy and Army Symphonic Band Concert

ML/ML/PGB
7 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *