आक्रमक फेड दरवाढीच्या चिंतेमुळे भारतीय बाजार गडगडला

मुंबई, दि. 11 (जितेश सावंत): जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आठवड्याच्या सुरुवातीला दमदार सुरुवात होऊन देखील फेड दरवाढीबद्दल वाढलेल्या चिंतेमुळे बाजाराच्या आठवड्याचा शेवट मोठ्या घसरणीने झाला.यूएस फेडरल रिझव्र्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या पुढील काळात मोठी दरवाढ होण्याची शक्यता आहे अशी टिप्पणी केल्याने त्याचे पडसाद जागतिक बाजारावर उमटले व गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली.बाजार स्वतःला सावरू शकला नाही.
या आठवड्यात BSE सेन्सेक्समध्ये 1.12 टक्क्यांची तर निफ्टीत 1.03 टक्क्यांची घसरण झाली. जागतिक बाजारातील अस्थिरता सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शुक्रवारी अमेरिकन बाजाराचा निर्देशांक डाऊ जोन्स ३०० अंकांपेक्षा जास्त घसरला नियामकांनी सिलिकॉन व्हॅली बँक बंद केल्यानंतर शुक्रवारी शेअर्समध्ये झपाट्याने घसरण झाली.
2008 च्या आर्थिक संकटानंतर बँकेचे हे सर्वात मोठे अपयश आहे. यामुळे आणि दर वाढीच्या भीतीमुळे बाजार पडला. Dow tumbles 345 points after massive bank failure and rate hike fears .
शुक्रवारी देशांतर्गत बाजार बंद झाल्यानंतर औद्योगिक उत्पादनाचे आकडे जाहीर झाले, देशातील औद्योगिक उत्पादनाने वेग घेतला, जानेवारीमध्ये 5 टक्क्यांच्यावर वाढ झाल्याचे निदर्शनास आले.India’s industrial production growth recovers to 5.2% in January.
येणाऱ्या आठवड्यात सुद्धा बाजारात चढउताराचे
(अस्थिरता) प्रमाण राहील. गुंतवणूकदारांचे लक्ष भारताचे १३ मार्च,अमेरिकेचे १४ मार्च रोजी जाहीर होणारे CPI आकडे.भारताचे १४ मार्च रोजी जाहीर होणारे wholesale price index चे आकडे,चीनचा१५ मार्च रोजी जाहीर होणारा IIP data.याकडे असेल.
Technical view on nifty
मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे निफ्टीने 17,799.95 पर्यंत जाण्यात यश मिळवले व 17,324.35 पर्यंतची नीचांकी पातळी गाठली. निफ्टीसाठी 17427-17450 हे स्तर अत्यंत महत्वपूर्ण राहील हे स्तर जर तोडले तर निफ्टी 17537-17584-17600 पर्यंत पोहोचू शकेल तसेच 17311-17300 हे स्तर तोडले तर निफ्टीत घसरण वाढू शकेल निफ्टी 17261-17241-17187-17144-17112-16957 हे स्तर गाठेल.
दलाल स्ट्रीटने दिल्या होळीच्या शुभेच्छा.
सेन्सेक्सने 60 हजारांचा टप्पा केला पार.
आठवड्याच्या पाहिल्या आणि सलग दुसऱ्या दिवशी बाजाराने आपली तेजी कायम ठेवली. जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये चांगली वाढ दिसून आली. जवळपास सर्व क्षेत्रात खरेदीचा कल दिसला. मात्र दुपारनंतर मेटल,रियल्टी आणि पीएसयू बँकांच्या विक्रीने इंट्राडे नफ्यांपैकी काही नफा पुसला गेला.
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी एक टक्का वाढले. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 415.49 अंकांनी वधारून 60,224.46 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 117.20 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,711.50 चा बंद दिला. D-Street in Holi mood! Sensex ends 415 pts higher
सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजार सावरला.
यूएस फेडरल रिझव्र्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या पुढील काळात मोठी दरवाढ होण्याची शक्यता आहे अश्या टिप्पणीमुळे मंगळवारी अमेरिकन बाजार कोसळला (The Dow Jones Industrial Average fell 1.72%),त्याच पार्श्वभूमीवर जागतिक बाजाराची सुरुवात कमकुवत झाली व त्याचे पडसाद भारतीय बाजारावर उमटले बुधवारी भारतीय बाजाराची सुरुवात घसरणीने झाली.सेन्सेक्स ३५० अंकांतून अधिक पडला.परंतु शेवटच्या तासाच्या रिकव्हरीमुळे बाजार दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाला.सेन्सेक्स नीचांकी पातळीपेक्षा 503 अंकांनी वाढून बंद झाला.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 123.63अंकांनी वधारून 60,348.09 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 42.90 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,754.40 चा बंद दिला.Indices concluded Wednesday’s volatile session in the green territory
सेन्सेक्स ५४२ अंकांनी घसरला. Sensex down 542 points
जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार गुरुवारी घसरणीसह बंद झाले.अत्यंत शांत सुरुवातीनंतर मंदीवाल्यानी बाजाराचा ताबा घेतला,सेकेंड हाफ मध्ये विक्रीच्या जोर वाढला व बाजार दिवसाच्या नीचांकाच्या जवळ बंद झाला. बाजाराने तीन दिवसांचा तेजीचा सिलसिला तोडला. ऑटो, आयटी, रियल्टी आणि एफएमसीजी निर्देशांकात 1 ते 1.5 टक्के घसरण झाली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 541.81अंकांनी घसरून 59,806.28 वर बंद झाला.
दुसरीकडे निफ्टीत 164.80 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,589.60 चा बंद दिला. Indian benchmark equity indices concluded Thursday’s volatile session deeply in the red
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला
सेन्सेक्स ६७१ अंकांनी घसरला , जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या घसरणीने बंद झाले.बाजाराची सुरुवात कमकुवतपणे झाली व दिवस पुढे जात असताना यूएस फेडच्या आक्रमक दरवाढीबद्दल वाढत्या चिंतेमुळे विक्रीचा जोर वाढला. दिवसभरात सेन्सेक्स जवळपास९०० अंक घसरला.बँक, वित्तीय, आयटी आणि वाहन निर्देशांकात सर्वाधिक घसरण दिसून आली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 671.15 अंकांनी घसरून59,135.13 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 176.70अंकांची घट होऊन निफ्टीने 17,412.90 चा बंद दिला.
Sensex ends 600 pts lower
(लेखकशेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)
ML/KA/PGB
11 Mar. 2023