फेडने व्याजदरात बदल न केल्याने भारतीय बाजार मध्यम वाढीसह बंद

 फेडने व्याजदरात बदल न केल्याने भारतीय बाजार मध्यम वाढीसह बंद

मुंबई, दि. २३ (जितेश सावंत) : 22 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय बाजार मध्यम वाढीसह बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स मधील घसरण.चीन आणि हाँगकाँगच्या शेअर बाजारातील घसरण तसेच यूएस फेडची बैठक,विदेशी गुंतवणूकदाराची विक्री,टेक दिग्गज एक्सेंचरने जाहीर केलेला कुमकुवत महसूल वाढीचा अंदाज यामुळे आय.टी (IT) समभागातील जोरदार पडझड या सगळ्याचा प्रभाव बाजारावर होताना दिसला.

फेडने व्याजदरात कोणताही बदल न केल्याने आणि 2024 मध्ये तीन दर कपातीच्या मागील अंदाजावर पुन्हा शिक्कामोर्तब केल्याने तसेच कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मनोधैर्य उंचावले व बाजार सावरण्यास मदत झाली. पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष प्रामुख्याने 28 मार्च रोजी जाहीर होणाऱ्या UK GDP आणि U.S. Initial Jobless Claims याकडे राहील. भारतीय बाजार दिनांक 25 मार्च रोजी होळी आणि 29 मार्च रोजी गुड फ्रायडे निमित्त बंद राहतील.

Technical view on nifty

शुक्रवारी निफ्टीने 22096.8 चा बंद भाव दिला.निफ्टी साठी 22040-20023-21962 हे महत्वाचे सपोर्ट(Support) आहेत. हे तोडल्यास निफ्टी 21926-21812-21797-21740.80-21697-21640-21598-21576.05-21547-21517-21500 हे स्तर गाठेल.वरच्या स्तरावर निफ्टी साठी 22126-22183
-22212-22239.80-22278-22297-22343-22389-22440-22462 -22517 हे रेसिस्टन्स (Resistance) ठरतील.

सेन्सेक्स 105 अंकांनी वधारला

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अत्यंत अस्थिर अश्या सत्रात बाजाराची सुरुवात काहीशी नकारात्मक झाली. दुपारपर्यंत बाजार विक्रीमूळे एका ठराविक पातळी भोवतीच फिरत राहिला.परंतु दुपारनंतर सर्व नुकसान पुसून टाकत बाजार मध्यम वाढीसह बंद झाला. IT आणि FMCG वगळता सर्व क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला मागील सत्रातील तोटा काही प्रमाणात कमी करता आला.

Sensex up 105 points

2024 साठी सेन्सेक्स नकारात्मक. मागील सत्रातील सौम्य वाढीनंतर मंगळवारी पुन्हा एकदा भारतीय बाजारात मोठया प्रमाणात घसरण पाहावयास मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे 1 टक्क्यांनी घसरले.मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सचे निर्देशांकही 1 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले.चीन आणि हाँगकाँगच्या शेअर बाजारातील घसरण तसेच यूएस फेडची बैठक,विदेशी गुंतवणूकदाराची विक्री,आय.टी (IT) समभागातील जोरदार पडझड ही बाजाराच्या घसरणीची प्रमुख करणे ठरली.चौफेर विक्रीमुळे सेन्सेक्स 800 अंकांपेक्षा जास्त गडगडला. बीएसई सेन्सेक्स 2024 या वर्षाकरिता निगेटिव्ह टेरिटरी मध्ये गेला.Sensex turns negative for 2024
फेड निकालापूर्वी सेन्सेक्स आणि निफ्टी हलक्या वाढीसह बंद झाले.

अत्यंत अस्थिर अश्या सत्रात बाजार हलक्या वाढीसह बंद झाला. फेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) च्या बैठकीच्या निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध पवित्र घेताना दिसले.बाजार दिवसभर नफा आणि तोटा यांच्यात गुरफटला होता पण ऑटो आणि एनर्जी समभागातील खरेदीमुळे निर्देशांक वरच्या पातळीवर पोहोचले.Sensex, and Nifty closed higher before the Fed outcome

फेडच्या निर्णयामुळे बाजारात उसळी

यूएस फेडरल रिझर्व्हने या वर्षी तीन दर कपातीचा अंदाज व्यक्त केल्याने गुरुवारी जगभरातील बाजरात तेजी पसरली. तेजीचा मागोवा घेत सेन्सेक्स आणि निफ्टी देखील वधारले.निफ्टीने पुन्हा 22,000 चा टप्पा पार केला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक देखील 2 टक्क्यापेक्षा जास्त वाढीसह बंद झाले. Federal Reserve maintained its projection of three rate cuts this year

सेन्सेक्स 191 अंकांनी वधारला

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. टेक दिग्गज एक्सेंचरने संपूर्ण वर्षाच्या महसूल वाढीचा अंदाज कमकुवत जाहीर केल्याने आय.टी निर्देशांक 2 टक्क्यांहून अधिक घसरला.परंतु इतर क्षेत्रातील खरेदीमुळे बाजार सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाले.Sensex gains 191 points.

( लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत )

jiteshsawant33@gmail.com

JS/ML/SL

23 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *