भारतीय बाजार ९ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद

जितेश सावंत
मुंबई दि २८– फेब्रुवारी महिना भारतीय शेअर बाजारांसाठी खूप आव्हानात्मक ठरला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय बाजारात तीव्र घसरण झाली. भारतीय बाजार जवळपास ९ महिन्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. सलग पाच महिने भारतीय बाजारात घसरण सुरु आहे. फेब्रुवारी महिन्यात सेन्सेक्स ४,००० अंकांपेक्षा जास्त घसरून बंद झाला तसेच निफ्टीची १९९६ नंतर सलग पाचव्या महिन्यात घसरणीसह बंद होण्याची ही पहिलीच वेळ. याचे प्रमुख कारण म्हणजे ‘ट्रेड वॉर’, जागतिक व्यापार युद्धाची भीती आणि मंदावलेल्या यूएस अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांना त्रास वाढला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 27 फेब्रुवारी रोजी घोषित केले की, मेक्सिकन आणि कॅनेडियन वस्तूंवर त्यांचे प्रस्तावित 25 टक्के शुल्क 4 मार्चपासून लागू होईल, तसेच चिनी आयातीवर अतिरिक्त 10 टक्के शुल्क लागू होईल, या घोषणेमुळे जागतिक बाजरातील कमकुवतपणा वाढला परिणामी भारतीय बाजार देखील घसरला. IT आणि वित्तीय समभाग, जेथे विदेशी गुंतवणूकदारांचे महत्त्वपूर्ण होल्डिंग आहे त्यात देखील घसरण झाली.
शुक्रवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या जी डी पी आकड्यात भारतीय अर्थव्यवस्था तिसऱ्या तिमाहीत 6.2% वाढली; आर्थिक वर्ष 25 मध्ये 6.5% वाढीचा अंदाज. जुलै-सप्टेंबर या कालावधीत ५.६ टक्के या सात तिमाहीच्या नीचांकी पातळीवर गेल्यानंतर डिसेंबर तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था 6.2 टक्क्यांनी वाढली.
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष ट्रम्प यांची भूमिका, विदेशी गुंतवणूकदारांचा कल, रुपयाची चाल, कच्च्या तेलाचे भाव यावर असेल. बाजार ज्या पद्धतीने घसरत आहे. ती एक प्रकारे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी संधी आहे. या अगोदर देखील अश्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. पण बाजार वधारला आता देखील बाजार वधारेल फक्त संयम हवा.आत्ताची परिस्थिती पाहता गुंतवणूकदारानी किमान दोन ते तीन वर्षाकरिता गुंतवणूक करावी. टेक्निकली बाजार ओव्हरसोल्ड आहे.
Technical Analysis of Nifty:
Closing on Friday: Nifty closed at 22124
KeySupportLevels:- 21900-21800- and 21,700 Breaking these could lead Nifty to further lower levels.
ResistanceLevels: 22300, 22400, 22450, 22560, 22642, 22650, 22681, 22744, 22798, 22865, 22929, 22979.23092 and 23163. These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.
Indian markets experienced a sharp decline on the last trading day of the week, closing at a 9-month low. The markets have been in a downward trend for five consecutive months. In February, the Sensex dropped by over 4,000 points, while Nifty recorded its fifth consecutive month of decline, the first such instance since 1996. The primary reasons for this downturn are the fear of a ‘trade war’, global trade tensions, and concerns over a slowing US economy, which have led to increased investor anxiety.
US President Donald Trump announced on February 27 that a 25% tariff on Mexican and Canadian goods and an additional 10% tariff on Chinese imports would take effect from March 4. This announcement exacerbated global market weakness, affecting Indian markets, particularly IT and financial stocks with significant foreign investments.
India’s GDP for Q3 showed a 6.2% growth, with a projected 6.5% growth for FY25, offering some optimism. Despite the market’s downward movement, it presents an opportunity for long-term investors, as similar situations have occurred in the past. Patience is key, and investors are advised to invest for at least 2-3 years, with the market currently being technically oversold.
Key factors to watch in the coming week include Trump’s policies, foreign investment trends, the rupee movement, and crude oil prices.
लेखक — शेअर बाजार,सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा तज्ज्ञ आहेत.
The author is an expert in stock market, cyber law, and data protection law.
ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant