जागतिक अर्थव्यवस्थेतील कमजोर आर्थिक डेटामुळे भारतीय बाजार हादरला
मुंबई, दि. 3 ( जितेश सावंत) : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जागतिक अर्थव्यवस्थेतील कमजोर आर्थिक डेटामुळे शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी भारतीय बाजार मोठ्या प्रमाणात गडगडला तसेच सलग आठ आठवड्यांचा वाढीचा सिलसिला तोडला आणि साप्ताहिक नफा पुसून टाकला. त्याअगोदर गुरुवारी फेड प्रमुखांनी दिलेल्या सप्टेंबरमधील संभाव्य दर कपातीच्या संकेतांच्या पार्श्वभूमीवर निफ्टीने प्रथमच 25,000 चा टप्पा पार केला तसेच सेन्सेक्स देखील सर्वकालीन उच्च पातळीवर पोहोचला.परंतु शुक्रवारी बाजार मोठ्या प्रमाणात घसरला.
On Friday, August 2, Indian markets experienced a significant decline due to weak economic data from the global economy, ending an eight-week streak and wiping out weekly gains. The Nifty had previously surpassed the 25,000 mark for the first time on Thursday, and the Sensex had also reached an all-time high following indications of a potential rate cut in September by the Fed chief. However, the market experienced a sharp fall on Friday.
यूएस साप्ताहिक बेरोजगारीचे आकडे अपेक्षेपेक्षा कमी येतील आणि मॅन्युफॅक्चरिंग डेटा कमकुवत राहिल्याने गुंतवणूकदारांना भीती वाटली की फेडरल रिझर्व्ह दर कमी करण्यापासून परावृत्त होईल आणि याच भीतीपोटी गुरुवारी अमेरिकन बाजार 1.4 टक्क्यांनी घसरला आणि शुक्रवारी आशियाई बाजार मोठ्या घसरणीसह उघडला.
शुक्रवारी जाहीर झालेल्या अमेरिकेतील कमकुवत आर्थिक आकडेवारीमुळे (Job growth totals 114,000 in July, much less than expected, as unemployment rate rises to 4.3%) डाऊ जोन्स 600 अंकातून अधिक गडगडला (Dow closes down 600 points, Nasdaq enters correction after weak jobs report) सोमवारी भारतीय बाजारावर याचा असर होताना दिसेल.
Dow closes down 600 points, Nasdaq enters correction due to weak US economic data announced on Friday. The Indian market will feel its impact on Monday
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक घडामोडी,तिमाही निकाल (Q1 earnings),परकीय निधीचा प्रवाह(foreign fund inflow), कच्च्या तेलाच्या किमती(crude oil prices) अश्या महत्वाच्या गोष्टींकडे राहील.
Technical view on nifty
शुक्रवारी निफ्टीने 24717.7 चा बंद भाव दिला.निफ्टीसाठी 24686-24631-24619-24587-24543-24530.9-24502.2हेमहत्वाचेसपोर्ट(Support)आहेत.हे तोडल्यास निफ्टी24449-24433-24414-24388-24331-24281-24240-24193-24141-24123-24056-23992- हे स्तर गाठेल.वरच्या स्तरावर निफ्टीसाठी 24736–24754- 24789-24817-24834.8-24880-24917-24977-
24993-25101-25152- हे रेसिस्टन्स (Resistance) ठरतील.
(लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत)
jiteshsawant33@gmail.com
GS/ML/PGB
3 Aug 2024