भारतीय कबड्डी संघाने जिंकली आशियाई चॅम्पियन लीग

 भारतीय कबड्डी संघाने जिंकली आशियाई चॅम्पियन लीग

बुसान, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पवन सेहरावतच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय कब्बडी संघ जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी करत आहे. कोरिया प्रजासत्ताकमधील बुसान येथील ‘डोंग-युई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सेओकडांग कल्चरल सेंटर’ येथे शुक्रवारी झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप २०२३च्या अंतिम फेरीत भारतीय कबड्डी संघाने इराणचा ४२-३२ असा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

भारतीय कर्णधार पवन सेहरावतने सुपर १० बरोबर आघाडी केली. सामन्याच्या सुरुवातीच्या पाच मिनिटांत भारतीय पुरुष कबड्डी संघ इराणविरुद्ध गारद झाला. मात्र, खेळाच्या १०व्या मिनिटाला बचावाच्या काही टॅकल पॉइंट्स आणि पवन सेहरावत आणि अस्लम इनामदार यांच्या यशस्वी चढाईनंतर इराणला ऑलआऊट करण्यात टीम इंडियाला यश आले.

इराणच्या मोहम्मदने भारताच्या अर्जुन देश्वालच्या काही चढाया अपयशी ठरल्यानंतर त्यांच्या संघासाठी खाते उघडले. मात्र, अखेर भारतीय संघाचा खेळाडू अर्जुनने पहिला गुण मिळवून दिला. ३-३ अशी गुणसंख्या असताना सामना अटीतटीचाच वाटत होता, पण सामन्यात नितेशची मजबूत पकड अन् पवन शेहरावतच्या जबरदस्त चढायांच्या जोरावर भारताने १०-४ अशी आघाडी घेतली. त्यानंतर टीम इंडियाने मागे वळून पाहिले नाही. नितिन रावतनेही चांगल्या कामगिरी केली. पहिल्या हाफमध्ये भारताने २३-११ अशी आघाडी मजबूत केली होती.

या रोमहर्षक फायनलमध्ये भारताने पहिल्या सत्रात २३-११ असे वर्चस्व राखले.दुसऱ्या सत्रात इराणकडून चांगला खेळ पाहायला मिळाला. ३३-१४ अशा पिछाडीवर असलेल्या इराणने सामना ३८-३० असा चुरशीचा बनवला. त्या सत्रात भारताला केवळ पाच गुण मिळवता आले, पण दुसऱ्या बाजूला इराणने १६ गुणांची कमाई केली करत सामन्यात रोमांचकता आणली. शेवटच्या टप्प्यात भारताच्या खेळाडूंनी दमदार खेळ करत ४२-३२ असा रोमहर्षक विजय निश्चित केला.

भारतीय कबड्डी संघाचा स्टार कर्णधार पवन सेहरावतने विरोधी संघाकडून विजय खेचून आणला. त्यानेच सर्वाधिक गुण मिळवले आणि विजयात मोलाची भूमिका बजावली.

SL/KA/SL

30 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *