भारतीय GDP चा उच्चांक, इंग्लंड, फ्रान्स, रशियाला टाकले मागे
नवी दिल्ली : जागतिक पातळीवर प्रगतीचे अनेक मार्ग चोखाळत भारतीय अर्थव्यवस्था आता GDP च्या बाबतीत जगातील पहिल्या पाच देशांमध्ये समाविष्ट झाली आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनानं अर्थात जीडीपीनं नवा विक्रम प्रस्थापित करत जीडीपी ३.७५ ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे. यामुळं जागतीक अर्थव्यवस्थेत भारताचा टक्का वाढत असल्याचं हे द्योतक आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
भारताचा जीडीपी आता ३.७५ ट्रिलियन डॉलवर पोहोचला आहे. सन २०१४ मध्ये तो २ ट्रिलियन डॉलरवर होता. पण नव्या किर्तीमानामुळं आता भारत जगातील १० व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेकडून ५ व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचला आहे. जागतीक अर्थव्यवस्थेत यामुळं भारत चमकदार तारा बनला असल्याचंही सीतारामन यांनी म्हटलं आहे.
जगातील दहा सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था
अमेरिका – 26,854 ट्रिलियन डॉलर
चीन- 19,374 ट्रिलियन डॉलर
जपान – 4,410 ट्रिलियन डॉलर
जर्मनी- 4,309 ट्रिलियन डॉलर
भारत – 3,737 ट्रिलियन डॉलर
ब्रिटन – 3,159 ट्रिलियन डॉलर
फ्रन्स – 2,924 ट्रिलियन डॉलर
कॅनडा – 2,089 ट्रिलियन डॉलर
रशिया – 1,840 ट्रिलियन डॉलर
ऑस्ट्रेलिया – 1,550 ट्रिलियन डॉलर
SL/KA/SL
12 June 2023