आंतरराष्ट्रीय रिपोर्टमध्ये भारतीय खाद्यसंस्कृतीच कौतुक

 आंतरराष्ट्रीय रिपोर्टमध्ये भारतीय खाद्यसंस्कृतीच कौतुक

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध आंतरराष्ट्रीय पदार्थ, आहारपद्धती, डाएटचे अनेक प्रकार या साऱ्या गर्दीमध्ये चौरस गुणयुक्त भारतीय आहाराचे महत्त्व नेहमीच उठून दिसते. ऋतूमानानुसार वैविध्यपूर्ण स्थानिक धान्यांचा समावेश हे भारतीय आहाराचे मोठे वैशिष्ट्य मानले जाते. लेटेस्ट लिविंग प्लॅनेट रिपोर्टच्या रिसर्चमध्ये भारतीय आहार हा सर्वांधिक पर्यावरण अनुकूल असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय आहार पद्धती G 20 देशांमध्ये सर्वाधिक स्थायी आणि पर्यावरण अनुकूल आहे, या शब्दांत भारतीय आहाराचं कौतुक करण्यात आलं आहे. 2050 पर्यंत जगातील सर्व देशांनी भारताचाच डाएट पॅटर्न स्वीकारला, तर यामुळे वातावरण बदल वाढणार नाही. जैव विविधतेची हानी होणार नाही. नैसर्गिक साधनसंपत्ती बरोबर अन्न सुरक्षा धोक्यात येणार नाही असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

या रिपोर्टमध्ये अमेरिका, अर्जेंटीना आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांच्या डाएट पॅटर्नला सर्वात कमी रँकिंग देण्यात आले आहे. या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात फॅटी आणि शुगरी फूड्सच्या सेवनामुळे लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढत आहे. या देशांमध्ये जवळपास अडीच कोटी लोक ओव्हरवेट आहेत, असा रिपोर्टमध्ये इशारा देण्यात आला आहे.

बातमी अपडेट होत आहे….

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *