भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट

भारत-रशिया सरकारच्या वतीने लष्करी सहकार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाच्या 21 व्या सत्रानिमित्त भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे रशिया दौऱ्यावर आहेत. तेव्हा राजनाथसिंह यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे त्यांचे फोटो समोर आले आहेत. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, ‘भारत-रशियाची मैत्री ही जगातील सर्वोच्च शिखरापेक्षा अधिक उच्च आणि समुद्रापेक्षा अधिक खोल आहे.’ दरम्यान राजनाथ सिंह यांनी रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोसोव्ह यांचीही भेट घेतली.