आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर

मुंबई, दि. १९ : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यावेळी निवड समितीने अनुभव आणि युवा खेळाडूंचा समतोल साधलेला संघ निवडला आहे. ही टी-२० स्वरूपातील स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरात (UAE) येथे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून निवडला गेला असून, शुबमन गिल उपकर्णधारपद भूषवणार आहे.
संघात जसप्रीत बुमराहचा पुनरागमन विशेष लक्षवेधी ठरला आहे, कारण तो दीर्घकालीन दुखापतीनंतर पुन्हा मैदानात उतरणार आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामी फलंदाज म्हणून निवडले गेले असून, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. यष्टीरक्षक म्हणून जितेश शर्मा आणि संजू सॅमसन यांची निवड झाली आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि बुमराह यांचा समावेश आहे, तर फिरकीपटूंमध्ये वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांना संधी देण्यात आली आहे.
रिंकू सिंह फिनिशरच्या भूमिकेत असेल. काही अनुभवी खेळाडूंना वगळण्यात आले असून, त्यात श्रेयस अय्यर, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. भारत अ गटात असून, युएई, पाकिस्तान आणि ओमानविरुद्ध सामने खेळणार आहे. भारताने आतापर्यंत आठ वेळा आशिया चषक जिंकला आहे, त्यामुळे यंदाही विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. संघात युवा जोश आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश असल्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
भारत अ गटात असून त्यांचे सामने पुढीलप्रमाणे:
१० सप्टेंबर – भारत vs युएई
१४ सप्टेंबर – भारत vs पाकिस्तान
१९ सप्टेंबर – भारत vs ओमान
जर भारत आणि पाकिस्तान सुपर फोर फेरीत पोहोचले, तर २१ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबर रोजी आणखी दोन सामने होऊ शकतात.
भारताने आतापर्यंत आशिया चषकात सर्वाधिक ८ वेळा विजेतेपद पटकावले आहे, त्यामुळे यंदाही भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.