FIDE महिला विश्वचषक अंतिम फेरीत भारतीय बुद्धीबळपटू आमनेसामने

बटुम, दि. २५ : जॉर्जियातील बटुमी येथे सुरु असलेली यावर्षीची बुद्धिबळ FIDE विश्वचषक स्पर्धा भारतीयांसाठी मोठी उत्सुकतेची आणि अभिमानाची ठरणार आहेत. कारण या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय बुद्धीबळपटू आमनेसामने आल्या आहेत. दिव्या देशमुखनंतर, कोनेरू हम्पीने महिला बुद्धिबळ FIDE विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कोनेरू हम्पीने उपांत्य फेरीत टायब्रेकरमध्ये चीनच्या टिंगजी लेईचा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. विश्वचषक अंतिम फेरीत दोन्ही खेळाडू भारतीय असतील अशी ही पहिलीच वेळ असेल. या दोघी भारतीय खेळाडूंनी आता पुढील वर्षी होणाऱ्या महिला कँडिडेट्स टूर्नामेंटसाठीही आपली जागा निश्चित केली आहे.
कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यात ही ऐतिहासिक लढत रंगणार आहे. हा अंतिम सामना शनिवार, 26 जुलै रोजी सुरू होईल. पहिला डाव – 26 जुलै (शनिवार) आणि दुसरा डाव – 27 जुलै (रविवार) रोजी असले, आणि जर टायब्रेक्स झाला तर 28 जुलै (सोमवार) रोजी खेळवले जातील.
विजेत्या खेळाडूला $50,000 (सुमारे ₹41.6 लाख रुपये) मिळतील.
उपविजेत्याला $35,000 (सुमारे ₹29.1 लाख रुपये) दिले जातील.
या स्पर्धेत पहिल्यांदाच चार भारतीय महिला खेळाडूंनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. कोनेरू हम्पी व्यतिरिक्त, हरिका द्रोणवल्ली, आर. वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी क्वार्टर फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले.
SL/ML/SL