आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी जिंकली १११ पदके

गाऊंझाऊ, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमधील गाऊंझाऊ येथे सुरु असलेल्या आशियाई पॅरा गेम्सची आज सांगता झाली. या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी पहिल्यांदा शंभरपेक्षा जास्त पदकं मिळवत सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. भारतीय पॅरा अॅथेलिट्सने १११ पदकं जिंकली आहेत. आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय पॅरा खेळाडूंनी २९ सुवर्ण, ३१ सिल्वर, आणि ५१ ब्रान्ज पदकं जिंकून पदतालिकेत ५ वे स्थान मिळवले तर चीनने ५२१ पदक जिंकत पहिले स्थान मिळवले आहे.
भारतीय खेळाडूंनी अॅथलेटिक्समध्ये सर्वात जास्त ५५ पदकं जिंकली आहेत. तर बॅडमिंटन खेळाडूंनी ४ सुवर्ण पदकासह २१ पदकं जिंकली आहेत. बुद्धीबळात ८ आणि तिरंदाजीमध्ये ७ पदकं भारताने जिंकली आहेत. तर नेमबाजांनी ६ पदक जिंकली आहेत. शेवटच्या दिवशी भारतांनी ४ सुवर्णासह १२ पदकं जिंकली आहेत. यात ७ पदकं बुद्धीबळात तर ४ अॅथलेटिक्समध्ये आणि एक नौकानयनमध्ये जिंकल आहे.
याआधी आशियाई गेम्समध्ये भारताने १०७ पदक जिंकली होती. याआधी २०१०मध्ये ग्वांग्झूत झालेल्या अशियाई पॅरा गेम्समध्ये १४ पदकं जिंकत भारत १५ स्थानावर होता.
SL/KA/SL
28 Oct. 2023