विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारतीय हवाई दलावर महत्त्वाची जबाबदारी

 विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारतीय हवाई दलावर महत्त्वाची जबाबदारी

अहमदाबाद, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क). : टीम इंडियाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याने देशात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. रविवार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघादरम्यान विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय एअर फोर्सकडे एक महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.Indian Air Force has an important responsibility in the World Cup Cricket Final

सूर्य किरण एअरोबॅटिक टीमकडून सामन्याआधी आकाशात ‘एअर शो’ दाखवला जाणार आहे.

सामन्याआधी नरेंद्र मोदी स्टेडियमवरती १० मिनिटांचा हा एअर शो असणार आहे.

सूर्य किरण टीमध्ये नऊ एअरक्राफ्टचा समावेश आहे. हे एअरक्राफ्ट ‘हवाई करतब’ दाखवतील.

सूर्य किरण टीमची स्थापना १९९६ मध्ये करण्यात आली होती. भारतीय एअर फोर्सची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून ही टीम काम करत असते. सूर्य किरण टीम त्यांच्या ‘एअर शो’साठी ओळखली जाते. टीमने भारतात आणि जगातील इतर देशांमध्येही आपल्या कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. टीममध्ये एकूण १३ पायलट असतात. त्यातील ९ जण प्रत्यक्ष करतब दाखवतात. पायलट तीन वर्ष या टीममध्ये राहू शकतात.
SL/ KA/ SL
17 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *