पॅरालिम्पिकमध्ये आज भारताने जिंकलं सहावं सुवर्णपदक, एकूण पदकसंख्या २६

 पॅरालिम्पिकमध्ये आज भारताने जिंकलं सहावं सुवर्णपदक, एकूण पदकसंख्या २६

पॅरिस, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय पॅरा ॲथलीट प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालिम्पिकच्या पुरुषांच्या उंच उडी T64 स्पर्धेत आशियाई विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले. लहान पायांसह जन्मलेल्या प्रवीणने सहा खेळाडूंमध्ये हंगामातील सर्वोत्तम २.०८ मीटर उडी मारली आणि अव्वल स्थान पटकावले. भारताचे हे एकूण २६ वे पदक आहे, तर हे सहावे सुवर्ण आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत नऊ रौप्य आणि ११ कांस्यपदक आली आहेत. प्रवीणचे पॅरालिम्पिकमधील हे सलग दुसरे पदक आहे. यापूर्वी, त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये २.०७ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने रौप्य पदक जिंकले होते.

उत्तर प्रदेशातील नोएडा येथील प्रवीण मरियप्पन (२१) हा पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडीत सुवर्णपदक जिंकणारा थंगावेलू नंतरचा दुसरा भारतीय पॅरा ॲथलीट आहे. या कामगिरीसह प्रवीण कुमार पॅरिसमध्ये पदक जिंकणारा तिसरा भारतीय उंच उडीपटू ठरला.

भारताला या सुवर्णपदकामळे पदक तालिकेत चांगलाच फायदा झाला आहे. कारण यापूर्वी भारत हा १७ व्या स्थानावर होता. तेव्हा भारताचे पाच सुवर्णपदकं होती. पण भारताला प्रवीण कुमारने सहावे गोल्ड मेडल जिंकवून दिले. सहाव्या गोल्ड मेडलनंतर भारत हा आता १३ व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताची ही सर्वात उजवी कामगिरी असल्याचे म्हटले जात आहे. कारण भारताने प्रथमच सहा गोल्ड मेडल्स पटकावले आहेत.

SL/ML/SL

6 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *