आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताकडून ५० पदकांची कमाई

 आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताकडून ५० पदकांची कमाई

गाऊंझाऊ, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमध्ये पार पडलेल्या आशियायी खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी विक्रमी कामगिरी केली. आता येथेच सुरु असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची यशस्वी कामगिरी करत आहेत. 22 ते २८ ऑक्टोबर या कालावधीत या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सध्या 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 20 कांस्य पदकांसह 50 पदकांसह पाचव्या स्थानावर आहे. भारतासाठी अंकुर धामा आणि रक्षिता राजू यांनी पुरुष आणि महिलांच्या 1500 मीटर T11 स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आणि भारतासाठी पदकांचे अर्धशतक पूर्ण केले.

सुमित अँटीलने बुधवारी चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत आपल्या सुवर्णपदकाचा यशस्वीपणे बचाव केला. तर पुरुषांच्या भालाफेक-F46 फायनलमध्ये 68.60 मीटर फेक करून सुंदर सिंगने आणखी एक विश्वविक्रम मोडला आणि सुवर्णपदक जिंकले.

पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अंतिलने बुधवारी F64 भालाफेक स्पर्धेत एक नवीन विश्वविक्रम नोंदवला आणि सुवर्णपदक जिंकले. पंचवीस वर्षीय सुमितने 73.29 मीटर भालाफेकत सुवर्णपदक जिंकले. त्याने स्वतःचा 70.83 मीटरचा विश्वविक्रम सुधारला. त्याने यावर्षी पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकताना केला होता. याच स्पर्धेत आणखी एक भारतीय पुष्पेंद्र सिंगने 60.06 भालाफेकत कांस्यपदक जिंकले. सुमितने टोकियो पॅरालिम्पिकच्या पुरुष भालाफेक F64 स्पर्धेत 68.55 मीटरच्या प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले होते, जो तत्कालीन विश्वविक्रम होता.

SL/KA/SL

25 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *