एकोणीस वर्षांखालील पुरुष क्रिकेट टीम ने जिंकला सलग सहाव्यांदा विश्वचषक

 एकोणीस वर्षांखालील पुरुष क्रिकेट टीम ने जिंकला सलग सहाव्यांदा विश्वचषक

झिम्बाँब्बे, दि. ६ : भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने इंग्लंडचा दणदणीत पराभव करत विश्वचषकाचा अंतिम सामना तब्बल100 धावांनी विश्वचषक जिंकला. याच बरोबर भारतीय संघाने सलग ६ व्यांदा विश्वचषक जिंकण्याचा विक्रमही केला आहे.या सामन्याचे कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत भारताने 411 धावा केल्या. लक्ष्यप्राप्ती करताना इंग्लंडला फक्त 311 धावा करता आल्या. वैभव सूर्यवंशीच्या 175 धावा आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारताला ऐतिहासिक विजय मिळाला. इंग्लंडला 28 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी होती, परंतु त्यांना भारतीय संघाचे आव्हान पार करण्यात अपयश आले. अंडर 19 विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याच संघाला 350 पेक्षा जास्त धावा काढता आल्या नाही. भारत हा पहिला संघ बनला त्यामुळे फायनल सामन्यात भारताने ऐतिहासिक कामगिरी केली.

वैभव सूर्यवंशीने 80 चेंडूत 15 चौकार आणि 15 षटकार मारत 175 धावा केल्या. भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेने अर्धशतक ठोकले. त्याने 51 चेंडूत 53 धावा केल्या. भारताकडून सर्वाधिक विकेट या अंबरीश सुकुमारने काढल्या. त्याने तीन विकेट घेतल्या. भारत आता सहाव्यांदा विजेता बनला आहे, या यादीत ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने चार वेळा 19 वर्षांखालील विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *