2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भारताकडे
मुंबई,दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ICC च्या 50 षटकांच्या विश्वचषक क्रिकेटस्पर्धा 2023 चे भारताकडे असणार आहे. 2023 मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर या स्पर्धा देशातील 10 शहरांमध्ये होणार आहेत.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ल्डकपचा पहिला सामना 14 ऑक्टोबर 2023 ला खेळवला जाणार आहे. तर पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्याचं आयोजन 23 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे तसेच दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामना 24 नोव्हेंबरला खेळवण्यात येईल आणि शेवटच्या अंतिम सामन्याचा थरार 26 नोव्हेंबरला रंगणार आहे. भारताच्या दहा मोठ्या शहरांमध्ये वर्ल्डकपचे सामने खेळवले जाणार आहेत.
यापूर्वी भारताने शेजारील देश पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्डकपचं आयोजन केलं होतं. भारताने 1987,1996, आणि 2011 मध्ये वर्ल्डकपचं यजमानपद भूषवलं आहे. मात्र, पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपचं आयोजन भारत स्वत:च करणार आहे. त्यामुळे दुसऱ्या देशावर अवलंबून न राहता यावेळी खुद्द भारतानेच वर्ल्डकपचं आयोजन केलं आहे. त्यामुळे एकट्या भारताने वर्ल्डकपसाठीचं आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. India to host the 2023 Cricket World Cup
SL/KA/SL
16 Nov. 2022