भारताने ओलांडली चीनची लोकसंख्या

 भारताने ओलांडली चीनची लोकसंख्या

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युनायटेड नेशन्स (UNFPA) ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या (Population) जास्त आहे आणि देशाची लोकसंख्या वाढत-वाढत 140 कोटींच्या पुढे गेली आहे. तर, चीनमधला जन्मदर यंदा चांगलाच खाली घसरला असल्याने त्यांची लोकसंख्या काहीशी आटोक्यात येत आहे.
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता चीन (China) नसून आपला भारत (India) देश आहे. या वर्षीच्या सुरुवातीलाच जागतिक तज्ञांनी 2023 मध्ये भारत हा सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असेल असा अंदाज वर्तवला होता.

युनायटेड नेशन्सच्या लोकसंख्या आकडेवारीत 1950 पासून भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त नोंदवली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. खरे तर 1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर युनायटेड नेशन्सची स्थापना झाली आणि 1950 पासून त्यांनी लोकसंख्येची आकडेवारी गोळा करण्यास सुरुवात केली. 1950 ते 2023 या कालावधीत युनायटेड नेशन्सने नोंदवलेल्या लोकसंख्येचा तक्ता पाहिला तर भारताची लोकसंख्या अशा प्रकारे वाढली-

UNFPA अहवालातनुसार, भारतातील 25% लोकसंख्या 0-14 वयोगटातील, 18% लोकसंख्या 10-19 वयोगटातील, 26% लोकसंख्या 10-24 वयोगटातील, 68% लोकसंख्येत 15-64 वर्षे वयोगटातील लोक आहेत आणि 65 वयोगटावरील 7% लोक आहेत.

चीनमध्ये 65 वर्षांवरील लोकांची संख्या 20 कोटी, म्हणजेच वयोवृद्धांची संख्या चीनमध्ये भारतापेक्षा दुप्पट आहे. काही दशकांपूर्वी, चीन सरकारने 1 मूल धोरण लागू केले होते, सरकारच्या या धोरणामुळे लोकांनी मुलांना जन्म देणेच बंद केले होते. त्यामुळे आता लोकसंख्या वाढीसाठी एकाहून अधिक मुले जन्माला घालावीत यासाठी चीन सरकार नागरिकांना विविध योजना देऊ करत आहे.

SL/KA/SL

19 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *