भारताने केली आजवरच्या सर्वांत शक्तिशाली मिसाईलची यशस्वी चाचणी
पोर्ट ब्लेअर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वायुसेनेने आजवरच्या सर्वांत शक्तीशाली अस्त्राची चाचणी केली आहे. शत्रूच्या हृदयात धडकी भरविणाऱ्या ब्रह्मोस सुपरसोनिक क्रुज मिसाईलची यशस्वी चाचणी अंदमान-निकोबार बेटांवर जवळ करण्यात आली आहे.मिसाईलने आपल्या टार्गेटला संपूर्ण नष्ट केले आहे. हे मिसाईल जगातील सर्वात वेगवान मिसाईल असून ते रडार चकवा देत हल्ला करते. रशिया आणि भारत यांच्या संयुक्त प्रयत्नाने याची निर्मिती करण्यात आली आहे.
भारतीय वायु सेनेने आता आपल्या जमिनीवरुन जमिनीवर मारा करता येऊ शकणाऱ्या ब्रह्मोस मिसाईलचा पल्ला वाढवून 450 किमी केला आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानची अनेक शहरे याच्या टप्प्यात आली आहेत. या मिसाईलची लांबी 28 फूट आहे. तर हे 3000 किलोग्रॅमपर्यंत वजन वाहू शकते. विशेष म्हणजे या मिसाईलवर 200 किलोग्रॅमपर्यंत अण्वस्रे देखील लादता येऊ शकतात.
या मिसाईलला जमिन, हवा, पाणी कोठूनही डागता येते. ते हवेत आपला रस्ता बदलू शकते तसेच चालत्या-फिरत्या टार्गेटलाही ते भेदते.या क्षेपणास्राच्या चाचणी मागे त्याचा पल्ला वाढविण्याचा उद्देश्य असल्याचे भारतीय वायू सेनेने दिलेल्या माहीतीत म्हटले आहे.
SL/KA/SL
11 Oct. 2023