ओमानसोबत भारताचा महत्त्वपूर्ण करार

 ओमानसोबत भारताचा महत्त्वपूर्ण करार

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भविष्यातील इंधनविषयक वाढत्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण धोरण स्वीकारत भारताने गेल्या काही वर्षांपासून मध्यपूर्वेतील मुस्लीम राष्ट्राशी सलोख्याचे संबंध निर्माण केले आहेत. भारताने यूईए सह अनेक मुस्लीम देशांसोबत चांगले चांगले व्यापारी संबंध आहे. त्यातच भारताने आता ओमानसोबत नवा करार केला आहे. भारताचा इराण सोबत तेलाचा व्यापरा आहे. पण ओमान हे भारत आणि इराणमधील होर्मुझच्या सामुद्रधुनीचे प्रवेशद्वार आहे, जे जागतिक तेलाच्या वाहतुकीसाठी एक प्रमुख प्रवेशद्वार आहे. भारत आणि ओमान यांच्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांवर आधारित दीर्घकालीन मैत्री आहे. भारत आणि ओमानमधील लोकांचा संपर्क सुमारे 5,000 वर्षे जुना आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध 1955 मध्ये प्रस्थापित झाले आणि 2008 मध्ये ते धोरणात्मक भागीदारीत श्रेणीसुधारित झाले.

सध्या भारतात लोकसभेच्या निवडणुका होत असल्याने कोणताही व्यापार करारावर होऊ शकत नाही. मात्र मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास लवकरच ओमानसोबत व्यापार करार होईल, असे संकेत दिले आहेत. भारत ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) सारख्या गल्फ कोऑपरेशन कौन्सिलच्या (GCC) सदस्यांसोबत व्यापार वाढवत आहे. ओमानसोबतच्या नियोजित करारामुळे पाकिस्तान आणि चीनला मोठा धक्का बसणार आहे. ओमानने कृषी उत्पादने, रत्ने आणि दागिने, चामडे, ऑटोमोबाईल्स, वैद्यकीय उपकरणे, अभियांत्रिकी उत्पादने आणि कापड यासह वार्षिक $3 अब्ज किमतीच्या भारतीय निर्यातीवरील आयात शुल्क माफ करण्याचे मान्य केले आहे. ओमानमधून काही पेट्रोकेमिकल्स, ॲल्युमिनियम आणि तांबे यांच्यावरील आयात शुल्क कमी करण्यास भारताने सहमती दर्शवली आहे.

भारत आणि ओमानमधील व्यापार गेल्या वर्षी वाढला जेव्हा ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक हे भारत भेटीवर आले होते. दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसोबत त्यांची बैठक झाली. यावेळी १० क्षेत्रांमध्ये भारतासोबत व्यापारावर चर्चा झाली.ओमानसोबतचा व्यापार करारामुळे भविष्यात भारतासाठी नवीन व्यापारी मार् खुले होण्यास मदत होणार आहे.

SL/ML/SL

29 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *