Global Hunger Index मध्ये भारत १०५ व्या स्थानी

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात अन्न सुरक्षा कायदा लागू होऊन मोफत धान्य मिळू लागले असले तरीही बऱ्याच समाज घटकांना अद्यापही भुकेले रहावे लागत असल्याचे नुकत्यात प्रसिद्ध झालेल्या अहवालात दिसून आले आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स २०२४ मध्ये भारत १०५ व्या स्थानी आहे.
या वर्षी ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) 2024 च्या यादीत 127 देशांमध्ये भारत 105 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी 125 देशांपैकी 111 व्या आणि 2022 मध्ये 121 देशांपैकी 107 व्या क्रमांकावर होता. म्हणजे यंदा परिस्थिती मध्यम स्वरूपाची आहे. परंतु भूक निर्देशांक स्कोअर अजूनही 27.3 आहे जो गंभीर आहे. प्रत्येक देशाचा GHI स्कोअर 3 आयामांच्या 4 स्केलवर मोजला जातो. हे तीन आयाम आहेत – कुपोषण, बालमृत्यू, बाल कुपोषण. बालकांच्या कुपोषणात दोन वर्ग आहेत – चाइल्ड वेस्टिंग आणि चाइल्ड स्टंटिंग.पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची स्थिती आपल्यापेक्षा वाईट आहे. पण नेपाळ, बांगलादेश, कंबोडिया, फिजी, श्रीलंका हे देश या इंडेक्समध्ये भारताच्या पुढे आहेत.
SL/ML/SL
10 Oct. 2024