पुढील वर्षापर्यंत भारताला १ लाख ड्रोन पायलट्सची गरज
नवी दिल्ली,दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टेक्नोसॅव्ही असलेल्या भारतीय तरुणाईसाठी आता रोजगाराचे एक नवे क्षेत्र खुले होणार आहे.येत्या काही वर्षांच भारत हा ड्रोन तंत्रज्ञानाचे केंद्र बनेल आणि पुढील वर्षापर्यंत भारताला किमान 1 लाख ड्रोन पायलटची आवश्यकता असेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. चेन्नई येथे आयोजित Drone Yatra 2.0 च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
ड्रोन तंत्रज्ञानामुळे देशात वार्षिक सुमारे ६ हजार कोटींचा रोजगार निर्माण होईल. प्रत्येक पायलटला महिन्याला किमान ₹50,000 ते ₹80,000 च्या दरम्यान मानधन मिळू शकेल. अशा माहितीही ठाकूर यांनी यावेळी दिली.
सध्या देशात 200 हून अधिक ड्रोन स्टार्टअप उद्योग आहेत. या क्षेत्रात काम करण्यासाठी युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी देशभरातील 775 जिल्ह्यांमध्ये गरुड ड्रोन स्किलिंग आणि ट्रेनिंग कॉन्फरन्स आयोजित केली जाणार आहे. याद्वारे 10 लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याची आशा आहे, असा विश्वास ठाकूर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
SL/KA/SL
6 Dec. 2022