जागतिक विकासात १६ टक्क्यांची भर घालणारा, भारत हा स्टार परफॉर्मर

 जागतिक विकासात १६ टक्क्यांची भर घालणारा, भारत हा स्टार परफॉर्मर

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)ने भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिक धोरणाचे आणि जागतिक आव्हानांच्या काळात झालेल्या वृद्धीचे कौतुक केले आहे. नाणेनिधीच्या वार्षिक चौथ्या सल्लागार अहवालात, असे म्हटले आहे, की भारत आर्थिक क्षेत्रात एक ‘स्टार परफॉर्मर’ म्हणून उदयाला आला असून, जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान, 16 टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. भारताच्या अचूक स्थूल अर्थशास्त्रीय धोरणांमुळेच, भारताच्या अर्थव्यवस्थेची गाडी, पुन्हा एकदा योग्य मार्गावर आली असून, या वर्षात भारत, जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक ठरला आहे.

“भारतात, आणखी विकास करण्याची क्षमता असून, श्रमशक्ती आणि मनुष्यबळाच्या योगदानाला, सर्वसमावेशक सुधारणांची जोड दिल्यास, आणखी विकास होऊ शकेल” असेही नाणेनिधीने म्हटले आहे. धोरणात्मक प्राधान्यक्रमांमध्ये वित्तीय राखीव साठा ठेवणे, वस्तूंच्या किंमतीचे स्थैर्य सुनिश्चित करणे, आर्थिक स्थैर्य राखणे आणि सर्वसमावेशक संरचनात्मक सुधारणांद्वारे सर्वसमावेशक विकासाला गती देणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेनं, पुढाकार घेऊन आखलेल्या मौद्रीक धोरणात्मक कृतींचे आणि किमतींच्या स्थैर्यासाठीच्या दृढ वचनबद्धतेचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कौतुक केले. आकडेवारीवर अवलंबून असलेल्या दृष्टिकोनावर आधारीत, सध्याची तटस्थ चलनविषयक धोरणात्मक भूमिका योग्य असून आणि हळूहळू महागाई दर, निर्धारित लक्ष्यापर्यंत परत आणण्याची भूमिका योग्य आहे, असं म्हटलं आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेतील महागाईचा वाढता दर लक्षात घेता, रिझर्व्ह बँकेच्या पतविषयक धोरण समितीने 2022-23 मध्ये, देशातली चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी, रेपो दर 250 बेसिस पॉईंटने वाढवून 6.5 टक्के केला होता.

संपूर्ण अहवाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://www.imf.org/en/News/Articles/2023/12/18/pr23458-india-imf-exec-board-concludes-2023-art-iv-consult

SL/KA/SL

19 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *