पॅरिस ऑलिंपिकसाठी भारताचा हॉकी संघ जाहीर

 पॅरिस ऑलिंपिकसाठी भारताचा हॉकी संघ जाहीर

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिंपिकसाठी हॉकी इंडियाने काल 16 सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा केली. संघाची कमान हरमनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आली आहे, तर मिडफिल्डर हार्दिक सिंगला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. हरमनप्रीतचे हे तिसरे ऑलिम्पिक असेल. अनुभवी खेळाडूंसोबतच 5 युवा खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आले आहे, जे ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहेत.

भारतीय पुरुष हॉकी संघ 27 जुलै रोजी न्यूझीलंडविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारतीय संघाला ब गटात स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया बेल्जियम, अर्जेंटिना, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंडसह ब गटात आहे. तर अ गटात नेदरलँड्स, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. गटागटात एकदाच संघ एकमेकांशी भिडतील. प्रत्येक पूलमधील टॉप-4 संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. पॅरिस-2024 ऑलिम्पिक हॉकी पदक फेरीचे सामने 8 ऑगस्ट रोजी नियोजित करण्यात आले आहेत.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय पुरुष हॉकी संघ

गोलरक्षक- पी.आर. श्रीजेश.

डिफेंडर- जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, सुमित, संजय.

मिडफिल्डर- राजकुमार पाल, शमशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद.

फॉरवर्ड- अभिषेक, सुखजित सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग, गुरजंत सिंग.

राखीव खेळाडू – नीलकांत शर्मा, जुगराज सिंग, कृष्ण बहादूर पाठक.

SL/ML/SL

27 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *