#भारताचा परकीय चलन साठा 585 अब्ज डॉलरच्या पुढे; सोन्याच्या साठ्याचे मुल्यही वाढले

 #भारताचा परकीय चलन साठा 585 अब्ज डॉलरच्या पुढे; सोन्याच्या साठ्याचे मुल्यही वाढले

नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील परकीय चलन साठा 22 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात 1.091 अब्ज डॉलरने वाढून 585.334 अब्ज डॉलर झाला. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. त्याआधी 15 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 1.839 अब्ज डॉलरने कमी होऊन 584.242 अब्ज डॉलरवर आला होता. 8 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 586.082 अब्ज डॉलरच्या सर्वोच्च पातळीवर होता.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पुनरावलोकन कालावधित परकीय चलन संपत्ती (एफसीए) मध्ये वाढ झाल्यामुळे चलन साठ्यात वाढ झाली. परकीय चलन संपत्ती एकूण परकीय चलन साठ्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. रिझर्व्ह बँकेच्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, पुनरावलोकन कालावधित एफसीए 68.5 कोटी डॉलरने वाढून 542.192 अब्ज डॉलर झाली. एफसीए डॉलरमध्ये दाखवली जाते, परंतु त्यात युरो, पौंड आणि येन सारख्या इतर परकीय चलन मालमत्तांचाही समावेश आहे.
आकडेवारीनुसार, 22 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात देशाच्या सोन्याच्या साठ्याचे मुल्य 39.8 कोटी डॉलरने वाढून 36.459 अब्ज डॉलर झाले. देशाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) मध्ये मिळालेला पैसे काढण्याचा विशेष अधिकार 10 लाख डॉलरने वाढून 1.513 अब्ज डॉलर झाला आहे, तर आयएमएफकडे राखीव चलन साठाही 70 लाख डॉलरने वाढून 5.171 अब्ज डॉलर झाला आहे.
आर्थिक सर्वेक्षण 2020-21 च्या आकडेवारीनुसार सध्याचा भारताचा परकीय चलन साठा 58424 कोटी डॉलर (42,56,758 कोटी रुपये) आहे. हा आकडा 15 जानेवारी 2021 पर्यंतचा आहे. त्याच्या तुलनेत भारताचे एकूण परकीय कर्ज (खाजगी क्षेत्राच्या कर्जासह) 55620 कोटी डॉलर (4052459.30 कोटी रुपये) (सप्टेंबर 2020) आहे. भारताचा प्रचंड परकीय चलन साठा देशाची परतफेड क्षमता दर्शवतो. आर्थिक सर्वेक्षणानुसार भारत अशा कंपनीसारखा आहे ज्याचे कर्ज नकारात्मक आहे आणि ज्याची परतफेड न करण्याची क्षमता शून्य आहे.
Tag-India/forex reserves/gold reserve
PL/KA/PL/30 JAN 2021

mmc

Related post