विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला सलग आठव्यांदा हरवले

 विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला सलग आठव्यांदा हरवले

अहमदाबाद, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानला सलग आठव्यांदा पराभूत केले असून आज झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला सात गडी राखून अक्षरशः चिरडले. रोहित शर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर केवळ १९२ धावांचे आव्हान दिले होते. १५५ धावांवर केवळ दोन फलंदाज बाद असणारा पाकिस्तानी संघ पुढील अवघ्या ३६ धावात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. सुरुवातीचे दोन गडी लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी ८३ धावांची भागीदारी रचली होती. मात्र आपले अर्धशतक पूर्ण करून बाबर बाद झाला आणि पाकिस्तानच्या पतनाला सुरूवात झाली. मोहम्मद सिराज ने एका उत्कृष्ट चेंडूवर त्याला त्रिफळाचित केले. India defeated Pakistan for the eighth time in a row in the World Cup

यानंतर एका पाठोपाठ हजेरी लावत पाकिस्तानी फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर अक्षरशः ढेपाळले. रिझवानच्या ४९ धावा वगळता इतर केवळ हजेरी लावून गेले. सिराज , बुमराह, जाडेजा , कुलदीप आणि हार्दिक यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करीत पाकिस्तानी फलंदाजी कापून काढली.यामुळे केवळ ४२.५ षटकात पकिस्तानी संघ केवळ १९१ धावात गारद झाला.

१९२ धावांचे माफक आव्हान पेलताना भारताची सुरूवात फार चांगली झाली नाही , सलामीवीर शुभमन गिल अवघ्या १६ धावा काढून बाद झाला. त्यानंतर मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाला सावरले , रोहित ने ८६ धावा करताना सहा षटकारांची आतषबाजी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर ने आपले अर्धशतक पूर्ण केले, त्याने नाबाद ५३ धावा केल्या, त्याच्यासोबत के एस राहुल १९ धावा करून नाबाद राहिला. भारताने केवळ ३०.३ षटकात सात गडी राखून सामना सहज जिंकला. आता गुणतालिकेत भारत सहा गुणांसह चांगल्या धावगतीच्या जोरावर पहिल्या स्थानावर आहे .

ML/KA/PGB
14 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *