भारत आणि कॅनडा यांच्यातील वाढता राजनैतिक तणाव,यूएस फेडची कडक भूमिका यामुळे गुंतवणुकदारांची चिंता वाढली.

मुंबई, दि. 23 (जितेश सावंत) : मागील आठवड्यात विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर 22 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात बाजार दबावाखाली राहिला.भारत आणि कॅनडा यांच्यातील वाढत्या राजनैतिक तणाव, यूएस फेडरल रिझव्र्हची व्याजदराबाबत कडक भूमिका, यूएस ट्रेझरी यिल्ड मधील वाढ, क्रूडच्या/ कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती ,विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची (FII) सतत विक्री,साप्ताहिक F&O समाप्ती,
एचडीएफसीबँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) सारख्या बाजारातील हेवीवेट्समधील जोरदार विक्री,यामुळे गुंतवणुकदारांची चिंता वाढली.
या आठवड्यात बहुतांश क्षेत्रांत विक्री झाली. या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 1,829.48 अंकांनी घसरला आणि निफ्टीत 518.1 अंकांची घसरण झाली.
The US Federal Reserve’s hawkish stance, increased US Treasury yields, rising crude prices, and ongoing foreign institutional investor selling have caused concern among investors.
शुक्रवारी अमेरिकन बाजाराचा निर्देशांक डाऊ जोन्स 106 अंकांनी घसरला.
Technical view on nifty-.
मागील आठवड्यात बाजार घसरणीने बंद झाला. शुक्रवारी निफ्टीने 19674.3 चा बंद भाव दिला.बाजार ओव्हर सोल्ड झोन मध्ये आहे. परंतू बाजार कमकुवत झाले आहे. येणाऱ्या आठवड्यात निफ्टी साठी 19650-19598-19550 हे महत्वाचे सपोर्ट स्तर आहेत हे तोडल्यास निफ्टी 19491-19430-19386-19369–19347-19334-19309-19258 हे स्तर गाठेल वरच्या स्तरावर निफ्टीसाठी 19744-19798-19848 हे स्तर रेसिस्टन्स (resistance) ठरतील हे स्तर ओढल्यास निफ्टी 19914-19979 चे टप्पे गाठेल.
सेन्सेक्स 242 अंकांनी घसरला
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी 18 सप्टेंबर रोजी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. कमकुवत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, बाजाराने दिवसाची सुरुवात गॅप डाउनने केली, बाजार संपूर्ण सत्रात नकारात्मक स्थितीत राहिले आणि दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाले.ऑटो, पॉवर आणि PSU बँकांमध्ये खरेदी झाल्याने घसरण कमी प्रमाणात झाली.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 241.79 अंकांनी घसरून 67,596.84 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 59 अंकांची घट होऊन निफ्टीने 20,133.30 चा बंद दिला.Sensex falls 242 points
सेन्सेक्स 796 अंकांनी घसरला
भारतीय इक्विटी निर्देशांक बुधवारी 20 सप्टेंबर रोजी सलग दुसऱ्या सत्रात घसरले आणि 8 सप्टेंबरनंतर निफ्टीने 19,900 च्या खालची पातळी गाठली.गॅप-डाऊन स्टार्टनंतर, विक्रीमुळे बाजार दबावाखाली राहिला आणि दिवस पुढे सरकताना त्यात वाढ होत गेली.एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) सारख्या बाजारातील हेवीवेट्स मधील जोरदार विक्री,यूएस फेडचा निर्णय,भारत आणि कॅनडादरम्यान सुरू असलेला तणाव,कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ तसेच यूएस ट्रेझरी यील्ड मधील वाढ आणि परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून (FPIs) विक्री.यामुळे सेन्सेक्स 800 अंकांतून अधिक गडगडला.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 796 अंकांनी घसरून 66,800.84 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 231.90 अंकांची घट होऊन निफ्टीने 19,901.40 चा बंद दिला. Bears tighten grip on D-St; Sensex down 796 points
भारत-कॅनडा तणावामुळे सेन्सेक्स 571 अंकांनी खाली, निफ्टी 19,750 च्या खाली
यूएस फेडरल रिझर्व्हच्या 2024 च्या कडक धोरणामुळे गुंतवणुकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे इक्विटी बाजार गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी आणि साप्ताहिक F&O समाप्तीच्या दिवशी विक्रीच्या दबावाखाली आले. याशिवाय, भारत आणि कॅनडा यांच्यातील वाढत्या राजनैतिक तणावामुळेही गुंतवणूकदारांच्या भावनांना धक्का पोहोचला. जागतिक बाजारातील कमजोरी,विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची (FII) सतत विक्री आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे चिंतेत अजून भर पडली.तीन दिवसांत सेन्सेक्स 1,300 अंकांनी घसरला. दिवसभराच्या
अखेरीस सेन्सेक्स 570.60 अंकांनी घसरून 66,230.24 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 159.05 अंकांची घट होऊन निफ्टीने 19,742.35 चा बंद दिला. Sensex down 571 pts, Nifty below 19,750 on hawkish Fed, Indo-Canada tension
सलग चौथ्या दिवशी सेन्सेक्समध्ये घसरण
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ,सलग चवथ्या दिवशी बाजारात विक्री पाहावयास मिळाली.
जागतिक बाजारातील कमजोरीमुळे बाजारात घसरण झाली. जेपी मॉर्गनच्या इमर्जिंग मार्केट इंडेक्समध्ये भारतीय रोख्यांचा समावेश करण्याच्या निर्णय देखील बाजारातील पडझडीला वाचवू शकला नाही.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 221.09 अंकांनी घसरून 66,009.15 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 68अंकांची घट होऊन निफ्टीने 19,674.30 चा बंद दिला. Sensex falls for 4th day.
( लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Techncal and Fundamental Analyst आहेत )
ML/KA/PGB 23 Sep 2023