इंडिया आघाडीने केली १४ जणांच्या समन्वय समितीची स्थापना

 इंडिया आघाडीने केली १४ जणांच्या समन्वय समितीची स्थापना

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी सरकार विरुद्ध एकवटलेल्या इंडिया आघाडीची तिसरी दोन दिवसीय बैठक कालपासून मुंबईमध्ये सुरू आहे. आज लोगो अनावरण होणार होते. मात्र संयोजक पद आणि लोगो वरून तीव्र मतभेद झाल्याने लोगो अनावरणा विनाच ही बैठक पार पडली. महत्त्वाची बाब म्हणजे या बैठकीत इंडिया आघाडीला पुढे नेण्यासाठी १३ सदस्यांच्या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत.

समन्वय कमिटीत 13 जणांचा समावेश
केसी वेणूगोपाल
शरद पवार
एम के स्टॅलिन
संजय राऊत
तेजस्वी यादव
अभिषेक बॅनर्जी
राघव चड्डा
जावेद खान
ललन सिंग
हेमंत सोरेन
मेहबूबा मुफ्ती
डी राजा
ओमर अब्दुला यांच्या समावेश

बैठकीत ठराव मंजूर झालेले ठराव

  • I.N.D.I.A. च्या सदस्यांनी लोकसभा निवडणूक शक्य असेल तिथे एकत्र लढवण्याचा संकल्प
  • राज्यांमध्ये जागा वाटपाची व्यवस्था लगेच सुरू होईल आणि ती व्यवहार्य भावनेने लवकरच संपुष्टात येईल.
  • I.N.D.I.A. च्या सदस्यांनी सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर देशभरात सार्वजनिक रॅली काढण्याचा संकल्प
  • आम्ही I.N.D.I.A. च्या सदस्यांनी अनेक भाषांत ‘जुडेगा इंडिया, जीतेगा इंडिया’ या थीमसह आमची रणनीती आणि मोहिमा समन्वयित करण्याचा संकल्प

दरम्यान या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. भाजप सूडबुद्धीनं काम करतंय, ते केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग करतायेत, आपल्याला अटकेची तयारी करावी लागेल असं खरगे म्हणाले. 

SL/KA/SL

1 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *