भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये मुक्त व्यापार करार

 भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये मुक्त व्यापार करार

मुंबई,दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑस्ट्रेलियाच्या  संसदेने मंगळवारी भारतसोबत मुक्त व्यापार करार (एफटीए)ला मंजुरी दिली. हा करार कोणत्या तारखेपासून लागू करायचा हे अद्याप निश्चित झालेले नाही.

एफटीए लागू झाल्यानंतर कपडे आणि दागिन्यासारखे भारताचे ६ हजारपेक्षा जास्त प्रॉडक्ट्सला ऑस्ट्रेलियाच्या बाजारात ड्यूटी फ्री मिळेल. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ही माहिती दिली.

गेल्या आर्थिक वर्षात भारताने ऑस्ट्रेलियाला ६७,७८६ कोटी रुपयांच्या मालाची निर्यात केली. त्या तुलनेत तेथून १.३७ लाख कोटी रुपयांची आयात करण्यात आली. कराराअंतर्गत ऑस्ट्रेलिया ९६.४% निर्यात (मुल्यांच्या आधारा) साठी भारताला शून्य सीमा शुल्क प्रवेश सुनिश्चित करेल.यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार जवळपास दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.

भारताकडून ऑस्ट्रेलियाला  निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू :

कापड, पोशाख, शेतीमाल, मत्स्य उत्पादने, चामडे, पादत्राणे, फर्निचर, क्रीडासाहित्य, दागिने आणि यंत्रसामग्री, इलेक्ट्रिक वस्तू, रेल्वे वॅगन यासारखी जवळपास ६ हजार उत्पादने.

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. “भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार ऑस्ट्रेलियन संसदेने मंजूर केल्याने आनंद झाला. आमच्या सखोल मैत्रीचा परिणाम म्हणून, आमच्या व्यापार संबंधांची पूर्ण क्षमता उघडकीस आणण्यासाठी आणि मोठ्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आमच्यासाठी हा टप्पा निश्चित करतो.”

India-Australia Free Trade Agreement

23 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *