INDIA आघाडीने टाकला १४ न्यूज अँकर्सवर बहिष्कार

 INDIA आघाडीने टाकला १४ न्यूज अँकर्सवर बहिष्कार

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्राती ल मोदी सरकारविरुद्ध देशव्यापी संघटन करू पाहणाऱ्या इंडिया आघाडीने देशातील १४ न्यूज अँकर्सवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील बहुतांश माध्यमे भाजपला विकली गेली आहेत.इथे फक्त मोदी सरकारचे गोडवे गायले जातात. सरकारच्या दुटप्पीपणाला विरोध केला जात नाही. काही माध्यम संस्था पक्षपाती बातम्या दाखवतात. तसेच त्यांचे वार्तांकन पक्षपाती असते. काही न्यूज अँकर्स त्यांचा स्वत:चा अजेंडा राबवतात. ते इंडिया आघाडीची बदनामी करत असून भाजपचे उद्दातीकरण करत आहेत, असे अनेक आरोप काँग्रेसकडून करण्यात आले होते. त्यामुळे काही न्यूज अँकर्सवर बहिष्कार टाकले जाणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आलीये.

इंडिया आघाडीने काही विशिष्ट न्यूज शोवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इंडिया आघाडीने न्यूज शो घेणाऱ्या अँकर्सची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितलं की, ‘इंडिया आघाडीचे नेते काही माध्यम संस्थांच्या न्यूज अँकर्सच्या शोमध्ये जाणार नाहीत. त्याची यादी जाहीर करण्यात येत आहे.’

न्यूज अँकर्स

अर्णब गोस्वामी (रिपब्लिक टीव्ही)
सुशांत सिन्हा (टाईम्स नाऊ नवभारत)
अशोक श्रीवास्तव (डीडी न्यूज)
आनंद नरसिंहन (CNN-News18)
गौरव सावंत (आज तक)
अदिती त्यागी (इंडियन एक्सप्रेस)
अमन चोप्रा (नेटवर्क १८)
अमिश देवगण (न्यूज18)
चित्रा त्रिपाठी (आज तक)
नाविका कुमार (टाइम्स नाऊ/टाईम्स नाऊ नवभारत)
प्राची पाराशर (इंडिया टीव्ही)
रुबिका लियाकत (भारत २४)
शिव आरूर (आज तक)
सुधीर चौधरी (आज तक)

भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. इंडिया आघाडीमध्ये देशातील २९ पक्षांचा समावेश आहे. इंडिया आघाडीच्या आतापर्यंत तीन बैठका देशभरात झाल्या आहेत. इंडिया आघाडीची पुढील रणनीती ठरवण्यासाठी आणि जागावाटपाच्या मुद्द्याबाबत पुढील बैठक भोपाळमध्ये घेतली जाण्याचे जाहीर केले आहे.

SL/KA/SL

14 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *