भांडवली नफा करात (LTCG/STCG ) वाढ झाल्याने निर्देशांकात मोठी घसरण

 भांडवली नफा करात (LTCG/STCG ) वाढ झाल्याने निर्देशांकात मोठी घसरण

मुंबई, दि. २७ (जितेश सावंत ) : मागील आठवड्याची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. गुंतवणूकदारांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले होते. अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती.या अस्थिरतेत भर पडली ती बजेटमध्ये जाहीर झालेल्या अल्पकालीन भांडवली नफा करात वाढ झाल्याने.
Last week Market started somewhat disappointingly as investors were focused on the budget. There was a lot of volatility in the stock market before the budget, and the hike in short-term capital gains tax announced in the budget added to this volatility

भांडवली नफा कर वाढवण्याची घोषणा शेअर बाजाराला आवडली नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला.करसंबंधित घोषणा होताच अचानक सेन्सेक्स आणि निफ्टी हे बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली.बाजारातील घसरणीचे दुसरे कारण म्हणजे F&O वर STT वाढवण्याचा प्रस्ताव. The market decline is also attributed to the proposal to increase Securities Transaction Tax (STT) on Futures and Options (F&O)

सर्व आर्थिक आणि गैर-वित्तीयवरील दीर्घकालीन भांडवली नफा कर (LTCG) 10 टक्क्यांवरून 12.5 टक्के आणि अल्पकालीन भांडवली कर (STCG) 15 टक्क्यांवरून 20 टक्के केल्याने गुंतवणूकदारांची पर्यायाने शेअर बाजाराची घोर निराशा झाली.Minister hiked the long-term capital gains tax (LTCG) on all financial and non-financial to 12.5 percent from 10 percent, in the Union Budget for 2024-25.

सोमवारी आर्थिक सर्वेक्षणात जाहीर झालेल्या आकडेवारीत भारतीय स्टॉक मार्केट मध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा F&O (Futures and Options) मधील सहभाग कित्येक पटींनी वाढल्याचे आणि हा चिंतेचा विषय असल्याचे नमूद केले गेले होते.यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) ट्रेडिंगमध्ये सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) दर वाढवण्याचा प्रस्ताव दिला. किरकोळ गुंतवणूकदारांचा धोकादायक व्यवसायातील सहभाग कमी करणे हा या निर्णयामागचा उद्देश आहे.असे ते त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाल्या.

गुरुवारपर्यंत सलग पाच दिवस बाजारात घसरण पाहावयास मिळत होती. परंतु शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराने जोरदार मुसंडी घेतली निफ्टीने विक्रमी उच्चांकाच्या जवळ बंद दिला. दिवसभरात निफ्टीने 1300 अंकांची वाढ घेतली. सकारात्मक जागतिक संकेत,अपेक्षेपेक्षा चांगला यूएस जीडीपी डेटा आणि यामुळे यूएस फेड द्वारे लवकर दर कपातीचे मिळालेले संकेत या जोरावर बाजारात लक्षणीय वाढ होताना दिसली. Positive global indicators, including stronger-than-expected US GDP data, suggest an early rate cut by the US Fed.

शुक्रवारी अमेकिन बाजारात मोठी तेजी पसरली होती. डाऊ जोन्स 650 अंकांनी वाढून बंद झाला. Dow closes 650 points higher buoyed by bullish inflation report
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष china industrial profit data,तिमाही निकाल(Q1 earnings),परकीय निधीचा प्रवाह (foreign fund inflow) अश्या महत्वाच्या गोष्टींकडे राहील.

Technical view on nifty

शुक्रवारी निफ्टीने 24834.8 चा बंद भाव दिला.निफ्टीसाठी 24754-24736-24631-24619-24587-24543-24530.9-24502.2 हे महत्वाचे सपोर्ट(Support)आहेत.
हे तोडल्यास निफ्टी 24449-24433-24414-24388-24331-24281-24240-24193-24141-24123-24056-23992- हे स्तर गाठेल.वरच्या स्तरावर निफ्टीसाठी 24880-24977-24993-25101-25152- हे रेसिस्टन्स (Resistance) ठरतील.

(लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत)

jiteshsawant33@gmail.com

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *