वाढत्या राजकीय हस्तक्षेपाची चर्चा मागासवर्गीय आयोगात

 वाढत्या राजकीय हस्तक्षेपाची चर्चा मागासवर्गीय आयोगात

पुणे, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची महत्त्वाची बैठक आज पुण्यात झाली . या बैठकीत आयोगाच्या कामकाजात वाढता शासकीय हस्तक्षेप, मागास प्रवर्गातील जातींच्या हक्कावर होणारे परिणाम यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे हे आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार पडली. निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, ॲड. बालाजी किल्लारीकर, प्रा. डॉ. संजीव सोनवणे, प्रा. डॉ. गजानन खराटे, डॉ. नीलिमा सरप (लखाडे), प्रा. डॉ. गोविंद काळे, प्रा. लक्ष्मण हाके आणि ज्योतीराम चव्हाण आदी आयोगाचे सदस्य बैठकीला उपस्थित होते. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या दरम्यान आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन चर्चा केली. Increasing political interference discussed in Backward Classes Commission

बैठकीत कार्यवाही पूर्ण झालेले अहवाल आयोगाच्या स्वाक्षरीसाठी सादर करणे, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड) या प्रवर्गास वाढीव आरक्षण देण्याबाबत प्राप्त निवेदनांवर निर्णय घेणे, आयोगाच्या कार्यालयातील रिक्त असलेल्या उच्चश्रेणी लघुलेखक पदावर कंत्राटी पद्धतीने लघुलेखकाची नियुक्ती करणे, जातपडताळणी समिती आणि इतर अर्धन्यायिक न्यायाधिकरणांच्या कामकाजात वाढता शासकीय हस्तक्षेप आणि मागास प्रवर्गातील जातींच्या हक्कावर होणारे परिणाम, आयोगाच्या विभागीय समित्यांकडे सोपविलेल्या प्रकरणांच्या सद्य:स्थितीबाबत चर्चा आणि आढावा घेण्यात आला असे आयोगाकडून सांगण्यात आले.

ML/KA/PGB
18 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *