राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरुन 46 टक्के इतका झाला आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

महागाई भत्त्यात वाढ करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अखेर आता महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य शासनाने काढलेल्या आदेशात म्हटलं आहे की, महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून ही वाढ 1 जुलै 2023 पासूनची मिळणार आहे. 1 जुलै 2023 पासूनची महागाई भत्त्याची थकबाकीसह नोव्हेंबर 2023 च्या वेतनासोबत कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.

SL/KA/SL

23 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *