मुंबईकरांच्या आरोग्यासाठी अर्थसंकल्पात वाढ

 मुंबईकरांच्या आरोग्यासाठी अर्थसंकल्पात वाढ

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महानगर पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असल्याने यंदा प्रथमच स्यायी समितीऐवजी पालिका प्रशासनाकडून मुंबई महानगर पालिकेचा सन 2023- 24 चा अर्थसंकल्प आज महापालिका मुख्यालयातील सभागृहात पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. Increase in budget for the health of Mumbaikars  यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू उपस्थित होते.

आजच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यासाठी १६८०.१९ कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली. गेल्या वर्षी अर्थसंकल्पामध्ये याच विभागासाठी १२८७.४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३९२.७८ कोटी रुपये इतकी प्रस्तावित वाढ करण्यात आली आहे.

प्रस्तावित तरतूद

उपनगरीय रुग्णालयांचा पुनर्विकास, हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान याचा विस्तार करण्यासाठी ५० कोटी, स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी १.४० कोटी, असंसर्गजन्य आजारांसाठी १२ कोटी, शीव योग केंद्रासाठी ५ कोटी रुपयांची
प्रस्तावित तरतूद यात करण्यात आली आहे.

आरोग्य अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्ये

– राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात मेट्रोपॉलिटीन सर्व्हिलन्स युनिटची स्थापना.
नागरीकांना परवडणाऱ्या दरांत अत्याधुनिक चाचण्या उपलब्ध करुन देण्याकरीता के.ई.एम., नायर व सायन रुग्णालयात प्रतिनग १५ कोटी इतक्या अंदाजित खर्चाची प्रत्येकी एक सी.टी.स्कॅन मशीन खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्याबरोबरच, के.ई.एम., नायर व शीव रुग्णालयात प्रतिनग २५ कोटी इतक्या अंदाजित खर्चाची प्रत्येकी एक ३ टेस्ला एम. आर. आय. यंत्रणा उभी करण्यात येणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेसाठी २०२२-२३ च्या सुधारीत अर्थसंकल्पामध्ये ७५ कोटी आणि सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ५० कोटी रुपये तरतूद  स्मशानभूमींच्या सुशोभिकरणासाठी १.४० कोटी रुपये तरतूद, किटकनाशके आणि फॉगिंग मशीनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यासाठी ३५ कोटी रुपये, असंसर्गजन्य रोग कक्षासाठी १२ कोटी रुपये, शिव योग केंद्रांसाठी ५ कोटी रुपये

 

ML/KA/PGB
4 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *