भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी, एलॉन मस्क यांचा ट्रम्प यांच्या सरकारमध्ये समावेश
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. २० जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. मात्र तत्पूर्वी ट्रम्प सरकार चालवण्यासाठी आपली टीम तयार करण्यात व्यस्त आहेत.सरकारमधील काही मोठ्या पदांवरील नियुक्त्या केल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्योजक एलॉन मस्क आणि भारतीय वंशाचे नेते विवेक रामास्वामी यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. मस्क आणि रामास्वामी हे सरकारच्या कार्यक्षमतेच्या विभागाचे (DoGE) नेतृत्व करतील. DoGE हा एक नवीन विभाग आहे, जो सरकारला बाह्य सल्ला देईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे.यासोबतच ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजचे होस्ट पीट हेगसेथ यांनाही त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे.