माथेफिरूने चालत्या गाडीत प्रवाशांसह सुरक्षा रक्षकांवर फेकला ज्वलन पदार्थ…
नाशिक, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकमान्य टिळक टर्मिनस जयनगर पवन एक्सप्रेसवर ज्वलनशील पदार्थ फेकल्याने दोन प्रवाशांसह सुरक्षारक्षक जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार लासलगाव- मनमाड रेल्वे स्थानकादरम्यान घडला आहे.incendiary material on security guards along with passengers in a moving car…
गाडी मनमाड स्थानकात येताच माथेफिरूला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांवरही त्याने ज्वलनशील पदार्थ फेकल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन कर्मचाऱ्यांसह मदतीसाठी गेलेल्या खाद्यपदार्थ विक्रेतेही जखमी झाले. या गदारोळात गाडी सुमारे २० मिनिटे मनमाड स्थानकात कोळंबली होती.रेल्वे सुरक्षा बलाने माथेफिरूला ताब्यात घेतले असून, रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग अधिक तपास करीत आहे.
मुंबईहुन निघालेली पवन एक्सप्रेस भुसावळकडे जात असताना सदर गाडी नाशिक रेल्वे स्थानकावरून निघाली असता या गाडीच्या अत्यंत सुरक्षित असलेल्या वातानुकूलित डब्यात स्वच्छतागृहात संशयित धनेश्वर यादव (रा. उत्तर प्रदेश) गेला होता. खूप वेळ झाला असता सदर व्यक्ती बाहेर निघत नसल्याने याच डब्यात प्रवास करणाऱ्या सैन्य दलातील जवान श्रीशंकर द्विवेदी यांना स्वच्छतागृहात जायचे होते. सदर जवानाने अनेकदा स्वच्छतागृहाचे दार वाजवूनही हा माथेफिरू बाहेर येत नसल्याने पुन्हा दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या माथेफिरूने दरवाजाची फट उघडी करून आतून ज्वलनशील लिक्विडचा फवारा सैन्य दलातील जवानाच्या अंगावर मारल्याने तो भाजला.
घटनेची माहिती तातडीने रेल्वेच्या कंट्रोल विभागाला देण्यात आली. कंट्रोलवरून ही माहिती सुरक्षा बलाच्या जवानांना देण्यात आली. सदर गाडी मनमाड रेल्वे स्थानकावर आल्यानंतर सुरक्षा बलाच्या जवानांनी स्वच्छतागृहाचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दार उघडले गेले नाही. परंतु, दार उघडल्यावर या माथेफिरूने उपस्थित असलेल्या सुरक्षा बलाच्या जवानांवर देखील ज्वलनशील लिक्विड फेकले.
ज्वलनशील पदार्थ फेकल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन कर्मचाऱ्यांसह मदतीसाठी गेलेले खाद्यपदार्थ विक्रेतेही जखमी झाले. या गदारोळात गाडी सुमारे २० मिनिटे मनमाड स्थानकातच उभी होती. सुरक्षा बलाने माथेफिरूला ताब्यात घेतले असून, रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग अधिक तपास करीत आहे.
ML/KA/PGB
24 Nov .2022