कामगार नेते अनिल गणाचार्य यांची प्रभारी पदी नियुक्ती
मुंबई, दि ७
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश चेनीथला यांच्या आदेशाने कामगार नेते अनिल गणाचार्य यांची चुनाभट्टी सायन प्रभाग क्रमांक 172 च्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. गणाचार्य यांनी याआधी मुंबई काँग्रेसचे सेक्रेटरी, महाराष्ट्र इंटकचे माजी उपाध्यक्ष, मुंबई इंटकचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांना या सर्व कामाचा पूर्ण अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचाच पक्षाला चांगला उपयोग होऊन पक्ष पुढे यशस्वी वाटचाल करणार असा मला विश्वास असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांनी दिली. गणाचार्य यांच्या निवडीमुळे सर्वच स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहे.KK/ML/MS