जगातल्या सर्वात मोठ्या दुपदरी बोगद्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

 जगातल्या सर्वात मोठ्या दुपदरी बोगद्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

इटानगर, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारकडून गेल्या काही वर्षांमध्ये बराच काळ दुर्लक्षित राहिलेल्या ईशान्य भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जात आहे. विकसित भारत, विकसित नॉर्थ ईस्ट’ या उपक्रमाचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या अरुणाचल प्रदेशातील ईटानगरातील सेला टनेलचे ( Sela Tunnel ) उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हा डबल लेनचा भुयारी मार्ग जगातील सर्वात मोठा असून त्याला बांधण्यासाठी 825 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. सेला प्रकल्पात दोन बोगदे आणि 8.780 किमीच्या रस्त्यांचा समावेश आहे. सेला बोगदा लष्करी आणि नागरी दोन्ही वाहनांसाठी उपयोगी ठरणार आहे. आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) आणि तवांग सेक्टरच्या पुढील सीमाभागात शस्त्रे आणि सैन्याची जलद तैनाती केली जाऊ शकते. बोगदा तयार झाल्यानंतर वर्षातील 12 महिने हा रस्ता खुला राहणार आहे.

पुर्वोत्तर राज्याच्या आपल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विकास योजनांची पायाभरणी देखील केली. यावेळी ‘विकसित भारत, विकसित नॉर्थ ईस्ट’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण पूर्वोत्तर राज्यात चारपट वेगाने विकासाचे काम सुरु असल्याचे सांगितले. राज्यांच्या विकासातून देशाचा विकास सुरु असून आपल्या विकसित पूर्वोत्तर उत्सवात सहभाग घेण्याचे भाग्य मिळाल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. सेला बोगद्यामुळे, तेजपूर ते तवांग दरम्यानच्या प्रवासाचा वेळ सुमार एक तासाने कमी होणार आहे. आणि सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध होणार आहे. सध्या हिवाळा आणि जोरदार बर्फवृष्टीमुळे सेला पास हिवाळ्यातील महिने बंद ठेवावा लागत होता.

सेला बोगदा प्रकल्पाचे बांधकाम भारतीय सैन्य दलाच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने केले आहे. सेला बोगदा प्रकल्पात दोन बोगदे आणि एक जोड रस्ता आहे. पहिला 1,980 मीटर लांबीचा सिंगल-ट्यूब बोगदा आहे. आणि दुसरा बोगदा 1,555 मीटर लांबीचा आहे. बोगदा-2 मध्ये वाहतुकीसाठी दोन-लेन ट्यूब आणि आणीबाणीसाठी एस्केप ट्यूब आहे. दोन बोगद्यांमधील लिंक रोड 1,200 मीटरचा आहे. सेला बोगदा, अप्रोच रोड आणि लिंक रोडसह प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे 12 किमी इतकी आहे. दोन्ही बोगदे सेलाच्या पश्चिमेला दोन शिखरांमधून आले आहेत.

SL/ML/SL

10 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *