देशातील पहिल्या फिश थिम पार्कचे उद्घाटन

सावंतवाडी, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नयनरम्य निसर्ग आणि भुरळ घालणारे समुद्रकिनारे यांमुळे पर्यटकांच्या आवडीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता देशातील पहिलं फिश थीम पार्क (Fish Theme Park) उभारण्यात आले आहे. सावंतवाडी तालुक्यातील केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ग्लोबल ॲक्वेरिअम उभारण्यात आले आहे. सोमवारी (दि. ११) या प्रकल्पाचा शुभारंभ झाला याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधूदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण (Minister Ravindra Chavan) यांनी दिली. कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढले पाहिजे, त्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकाला तिकडे सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, महत्त्वाच्या पर्यटन स्थळी पर्यटकांसाठी राहण्याची उत्तम सोय झाल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे चव्हाण म्हणाले.
या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देश विदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत. फिश थीम पार्कमध्ये विविध प्रकारचे रंगीत मासे तसेच गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे, देश-विदेशातील माशांच्या प्रजाती यांचा पार्कमध्ये समावेश आहे. याचा फायदा कोकणवासियांना तसेच महाराष्ट्रातील सर्वांना होणार आहे. विशेष म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. या फिश थीम पार्कचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.
या फिश थीम पार्कमध्ये माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था तसेच छोटेखानी तळेही निर्माण करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंगचा अनुभव मिळणार आहे. या फिश थीम पार्कमध्ये सुमारे तीन हजार पाचशे विविध जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे तसेच खाडीच्या पाण्यातील मासे पाहायला मिळणार आहेत.
SL/KA/SL
13 Sept. 2023