कार्सच्या सुरक्षेचे रेटींग देणाऱ्या स्वदेशी प्रोग्रामचे उद्या उद्घाटन
नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या भारतीय सुरक्षा एजन्सी भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत NCAP) चे उद्घाटन करणार आहेत. या स्वदेशी प्रोग्राममुळे भारतीय कार उत्पादक कंपन्यांना सुरक्षा रेटिंगसाठी त्यांच्या कार ग्लोबल NCAPकडे पाठवण्याची गरज नाही.कार ग्राहकांना बाजारात उपलब्ध असलेल्या वाहनांच्या अपघात सुरक्षेचे तुलनात्मक मूल्यांकन करण्यासाठी सुविधा देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. एखादा ग्राहक कार घेण्याचा विचार करत असेल, तर गाड्यांच्या सेफ्टी रेटिंगच्या आधारे तो कोणती कार घ्यायची हे ठरवू शकेल.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जून-2022 मध्ये BNCAP सुरू करण्यासाठी GSR अधिसूचनेच्या मसुद्याला मंजुरी दिली होती. भारतातील NCAP चा चाचणी प्रोटोकॉल ग्लोबल NCAP क्रॅश चाचणी प्रोटोकॉलसारखाच असेल. क्रॅश चाचणीमध्ये सध्याचे भारतीय नियम विचारात घेतले जातील.
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या देखरेख समितीच्या मंजुरीनंतर BNCAP स्टार रेटिंग आणि चाचणी परिणाम त्यांच्या वेबसाइटवर प्रदर्शित करेल. सुरुवातीला, क्रॅश चाचणी ऐच्छिक असेल, ज्यासाठी मूळ उपकरण उत्पादक (OEMs) त्यांच्या कारचे नमुने म्हणून पाठवू शकतील किंवा BNCAP डीलर्सच्या शोरूममधून कार घेतील. एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन, रियर कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ऑटो डोअर लॉक/अनलॉक, व्हेरिएबल लॉक/अनलॉक, डेटाइम रनिंग लाइट्स, रीअर डिफॉगर आणि वायपर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, डे/ रात्रीचे आरसे आणि धुके दिवे समाविष्ट आहेत का, बाबी या प्रोग्रामद्वारे तपासल्या जाणार आहेत.
यामुळे स्टार रेटिंगच्या आधारे सेफ्टी कार निवडण्याचा पर्याय ग्राहकांना मिळेल. यासोबतच, देशात सुरक्षित वाहनांच्या निर्मितीसाठी मूळ उपकरण उत्पादक (OEM) यांच्यातील निकोप स्पर्धेलाही प्रोत्साहन दिले जाईल.नवीन प्रणालीमुळे स्थानिक कार उत्पादनांनाही मदत होणार आहे. ते त्यांच्या वाहनांची भारतातील इन-हाऊस चाचणी सेवेमध्ये चाचणी घेण्यास सक्षम असतील. तसेच त्यांना त्यांच्या कार क्रॅश टेस्ट आणि स्टार रेटिंगसाठी परदेशात पाठवण्याची गरज भासणार नाही.
SL/KA/SL
21 Aug 2023