‘जेएनयू’ मध्ये मराठी अध्यासन केंद्राचे उदघाटन

नवी दिल्ली, दि. २४ : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने आनंदी झालेल्या मराठीप्रेमीसाठी आज आणखी एक आनंदाची बातमी आहे. राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात म्हणजे जेएनयू छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासनाची आजपासून सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यभाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितात हा सोहळा संपन्न झाला. याच दरम्यान होत एसएफआय म्हणजे स्टुंडट फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने (SFI) या उद्घाटन सोहळ्याला विरोध करण्यात. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गेटवर येऊन आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने विरोध दर्शवला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धोरणांना विरोध करत विद्यार्थी आक्रमक झाले होते, यावेळी त्यांच्याकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली.
देशाच्या कोणत्याही भागात जाणं हा आमचा संविधानिक अधिकार आहे. महाराष्ट्रात गेल्यावर आम्हाला मराठी बोलण्याचा हट्ट करणं चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया एका आंदोलकाने दिली. विविध आंदोलकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली आहे. काही आंदोलकांनी हिंदी भाषेला कशाप्रकारे सर्वांवर थोपवलं जात आहे यावरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तर काहींनी महाराष्ट्रात अमराठी लोकांना मारहाण होते, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना विरोध केला.