हायस्पीड ‘नमो भारत’ ट्रेनचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

 हायस्पीड ‘नमो भारत’ ट्रेनचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील पहिल्या प्रादेशिक रॅपिड ट्राझिट सिस्टिम प्रणालीवर RRTS चालणाऱ्या जलद रेल्वेचा शुभारंभ केला. उद्घाटना आधी या रेल्वेचे नाव बदलून ‘नमो भारत’ नवीन नाव ठेवण्यात आले. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील साहिबाबाद येथे पंतप्रधान मोदींनी या रेल्वे सेवेचे उद्घाटन केले. यावेळी RRTS Connect App चे उद्घाटनही करण्यात आले. पंतप्रधानांच्या मोबाईलवरून पहिले तिकीट खरेदी करण्यात आले.

या ट्रेनच्या पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील ५ स्थानके जोडण्यात आली आहेत. ६ डबे असलेल्या या रेल्वेला महिलांसाठी स्वतंत्र डबा देण्यात आला आहे.

दरम्यान या ट्रेन सेवेला नमो भारत हे नाव देण्यात आल्यामुळे विरोधकांनी तिव्र विरोध दर्शवला आहे.

SL/KA/SL

20 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *