अहिराणी साहित्य संमेलनाचे जल्लोषात उद्घाटन
धुळे.दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धुळे येथे आजपासून सुरू झालेल्या सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे मोठ्या जल्लोशात उद्घाटन करण्यात आले. दोन दिवस चालणारे अहिराणी साहित्य संमेलन स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब चुडामण पाटील साहित्य नगरी, हिरे भवन येथे होत आहे.
आज सकाळी दहा वाजता गांधी पुतळ्यापासून अहिराणीच्या पालखीचे व ग्रंथाचे पूजन करून दिंडीला सुरुवात झाली. खान्देशातील सण, उत्सव, परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या देखाव्यासोबत निघालेल्या दिंडीमुळे शहराचे वातावरण अहिराणीमय झाले. दिंडीमध्ये कानबाई, गौराई, भुलाबाई, डांख्या वाद्य, आदिवासी नृत्य, पोतराज, गोंधळी, व्हलर वाजा, लग्नाचे देवत, भजनी मंडळ असे खान्देशातील संस्कृतीचे दर्शन घडवणारे वैविध्यपूर्ण सजीव देखावे सादर करण्यात आले होते
या संमेलनाला खान्देशासह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातून नामवंत अहिराणी साहित्यिकांनी उपस्थित आहेत..
SL/KA/SL
21 Jan. 2023