या गावात बैलपोळ्या ऐवजी साजरा होतो ‘गाढव पोळा’
सोलापूर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय कृषी संस्कृतीमध्ये प्राण्यांनाही मानाचे स्थान आहे. मात्र यामध्ये कष्ट करणारे गाढव मात्र काही कारणांमुळे नेहमीच दुर्लक्षित राहीले आहे.अवजड ओझी वाहून नेण्याच्या कामामध्ये गाढव खूप उपयोगाचे ठरते. कथांमधून, म्हणींमधूनही बिचारे कष्टाळू गाढव नेहमीच चेष्टेचा विषय ठरते. अशा या दुर्लक्षित गदर्भराजाला सोलापूर जिल्ह्यातील एका गावात मात्र मोठा मान दिला जाते. बैल पोळ्याच्या दिवशी बैलाला अंघोळ घातली जाते. त्यांना सजवले जाते आणि त्यांनी पूजा केली जाते. तशाच प्रकारे सोलापूर शहरात गाढवांची पूजा केली जाते. या सणाला कारहूवानी सण असे म्हणतात. सोलापूर शहरातील लष्कर या भागात गाढवांची पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच या पोळ्याच्या दिवशी गाढवांकडून कोणताही काम करून घेतला जात नाही.
सोलापूर शहरातील लष्कर हा परिसर गाढवांच्या पोळ्यासाठी प्रसिद्ध आहे. हा गाढवांचा पोळा 40 ते 45 वर्षापासून साजरा केला जात आहे. या दिवशी गाढवांची रंगरंगोटी करून त्यांना सजवले जाते. यामुळे गाढवांना दोन दिवसांची विश्रांती मिळते. गाढवांना साजशृंगार करून पुरणपोळी, कुरडया, पापड-भजी यांसारखे स्वादिष्ट पदार्थ दिले जातात.
पूर्वी शेकडो गाढवांची या सणाला पूजा केली जायची. मात्र आता काळाच्या ओघात गाढवांची संख्या देखील कमी झाली आहे. तरीही अजूनही काहीच्या साधन गाढवं हेच आहे. त्यामुळे गाढवाची वर्षांतून एकदा पूजा करून त्याला गोडधोड खाऊ घातले जाते. मागील 45 वर्षापासून ही परंपरा जपली जात आहे.
SL/ML/SL
21 June 2024